आसूतील महिलांचे हातभट्टीने हरपले हसू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सातारा - देशी दारूबरोबर हातभट्टीच्या अड्ड्यांमुळे आसू (ता. फलटण) येथील महिलांचे हसूच हरपल्याची स्थिती झाली आहे. आजूबाजूच्या गावांत दारू अड्ड्यांना बंदी केल्यामुळे तब्बल दहा ते बारा अड्डे या एकाच गावात सुरू आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येण्याबरोबर महिला व युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पण, त्याकडे पोलिस प्रशासनाकडूनही होणारे दुर्लक्ष हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. 

फलटण तालुक्‍याच्या पूर्वेकडे आसू हे सुमारे दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे.

पांडवकालीन मंदिरामुळे या गावाला ऐतिहासिक वारसाही आहे. बागायती पट्ट्यामुळे तसे हे गाव सधनच. काही वर्षांपूर्वी (कै.) नारायणराव माने-पाटील यांच्या काळात गावाला आदर्श पोलिस पाटील पुरस्कारही मिळाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गावाला अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे.

पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
अवैध दारूधंद्यांमुळे आसू गावात बिकट परिस्थिती आहे. याबाबत गावातील ॲड. जीवन पवार यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदनही दिले होते. त्यानंतर परिविक्षाधीन अधीक्षक पवन बनसोड यांनी गावामध्ये कारवाया केल्या. मात्र, अवैध धंदेवाल्यांनी या कारवायांना जुमानले नाही. गावात पुन्हा जोमाने धंदे सुरू झाले आहेत. स्थानिक पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनीच आता यामध्ये लक्ष घालून गावात कायमस्वरूपी अवैध धंदे बंद होतील, अशी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Hatbhatti-Daru Woman Crime Police