कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये व्देष; शुभम शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubham Shelke

कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये व्देष; शुभम शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बेळगाव : कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये व्देष आणि वैर भावणा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याविरोधात माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनायक भोवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी महाराष्ट्राच्या नकाशावर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. कट्टर महाराष्ट्रवादी असूनही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मोकळेपणाने नाही देऊ शकत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी सर्वप्रथम रक्त सांडून आज ६६ वर्षे उलटून गेली.

अजूनही बेळगावसह सीमावासीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र कट्टर महाराष्ट्रवाना महाराष्ट्राच्या दिनाच्या शुभेच्छा. असा संदेश त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंट वरून व्हायरल केला होता. त्यामुळे याला काही कन्नड संघटनांनी आक्षेप घेत याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, शिवजयंतीच्या तोंडावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. मात्र, याप्रकरणी विनायक भोवी (रा. अंजनेयनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (ताय३) पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत. ऐनकेन प्रकारे मराठी भाषीकांना खोट्या नाट्या गुन्ह्यात गोवण्याचे कारस्थान पोलिसांनी सुरुच ठेवले असल्याने मराठी भाषीकातून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Hatred Between Kannada And Marathi Speakers Filed Case Against Shubham Shelke Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top