फेरीवाल्यांना हवा नाईट परवाना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

कोल्हापूर - शहरात रात्री-अपरात्री येणारे प्रवासी, विविध शासकीय व खासगी सेवेत रात्रभर सेवा देणारे कर्मचारी अशांना मध्यरात्रीनंतर चहा- नाश्‍ता करण्याची सुविधाच नाही. महापालिकेने फेरीवाल्यांसाठीचा नाईट परवाना देणे बंद केले आहे; तर फेरीवाले म्हणतात, 'नाईट परवाना देणे सरकारच्या नियमात आहे.' अशा परस्परविरोधी मतांत वर्षानुवर्षे रात्री अकरानंतर भूक भागवायची सुविधाच नाही, अशात किमान गरजेच्या ठिकाणी रात्रीच्या गाड्या चालविण्यास परवानगी मिळावी, अशी अपेक्षा फेरीवाल्यांची आहे. 

कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणून रात्रीच्या चहा-नाश्‍ता गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे इतरांना गैरसोय सोसावी लागते. यात सीपीआर, सावित्रीबाई फुले रुग्णालय, शहरातील सर्व पोलिस ठाणी, अग्निशामक दल येथे रात्रभर कर्मचारी असतात. 

शहरात मध्यवर्ती बसस्थानकात रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत जवळपास ११० हून अधिक गाड्या बाहेरगावांहून येतात. या प्रवाशांना रात्री अकरापर्यंत बसस्थानकाबाहेर चहा, नाश्‍ता मिळू शकतो. 

या कारणांसाठी परवाने बंद 
बसस्थानकावरील चहा, नाश्‍ता गाड्या पूर्वी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. मात्र, या गाड्यांवर काही फाळकुटदादांची दादागिरी होऊ लागली. त्यातून वाद, मारामाऱ्या घडल्या. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले. याची दखल घेत तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक शहाजी उमाप यांनी रात्री अकरानंतर या गाड्या बंद करण्याचे आदेश दिले.  त्यामुळे बसस्थानकावर नव्हे तर शहरात अन्यत्र कोठेही गाड्या नाहीत.

नाईट शिफ्टला चहा-नाश्‍त्याच्या गाड्या असाव्यात, असा नियम आहे. मात्र, महापालिकेने रात्रीचा परवाना देत नसल्याचे लेखी पत्र दिले. ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो, तो पोलिसांनी हाताळावा. पण, गरजेच्या ठिकाणी तरी चहा, नाश्‍ता गाड्या सुरू करण्यास परवानगी द्यावी. वेळा, ठिकाणे ठरवून देऊन फेरीवाल्यांना परवानगी द्यावी.
- दिलीप पवार, नेते, फेरीवाले संघटना

Web Title: Hawkers night permission