प्रेेमामध्ये त्याने गमावला जीव

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आकाश राजेंद्र मांढरे (रा. मांढरदेव, ता.वाई) असे त्याचे नाव आहे.
 

सातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आकाश राजेंद्र मांढरे (रा. मांढरदेव, ता.वाई) असे त्याचे नाव आहे.

तो सध्या (कण्हेरी, ता. खंडाळा) येथे मामाकडे राहत होता. तेथील एका अल्पवयीन मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते. त्या मुलीला त्याने दि.14 रोजी पळवून नेले. त्यानंतर हे दोघे घरी आले. याबाबत, मुलीच्या पालकांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात नेल्यावर लघुशंकेचा बहाणा करून पसार तो झाला होता.  आज सकाळी 8.30 वाजता बोरगाव परिसरातील खोडद फाटा (ता. सातारा) येथे त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: He lost his life in love