व्याजाच्या पैशासाठी त्याने केले हे कृत्य...

व्याजाच्या पैशासाठी त्याने केले हे कृत्य...

जत : शहरात पैशाच्या व्यवहारातील व्याजाचे 17 हजार 400 रुपये देण्याच्या कारणातून येथील एस. टी. बस स्थानकातील उपहारगृह एकाने फोडले. यात 15 ते 16 हजारांचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. 26) सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. जत पोलिस ठाण्यात उपहारगृह चालक सुरेश मुर्ग्याप्पा अंगडी (वय 57, मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी रोहित लक्ष्मण सगरे व आई मंजुळा लक्ष्मण सगरे (चिनगी बाबा, मंदिरामागे, जत) यांच्यावर तोडफोड, सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोघांनाही अटक झालेली नाही. 

पोलिसांनी माहिती दिली, की सुरेश अंगडी यांचे जत एस. टी. बसचे उपहारगृह भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी घेतले आहेत. सन 2016 मध्ये जत एस. टी. आगार प्रशासनाने तीन महिन्यांपासून अंगडी यांनी भाडे भरले नसल्याने भाडे भरा, अन्यथा करार रद्द करण्यात येईल, असे सांगितले होते. 

दरम्यान, अंगडी यांनी बॅंक, पतसंस्थांकडे कर्जाची मागणी केली. एस. टी. ला तत्काळ पैसे भरायचे असल्याने त्यांनी मंजुळा सगरे यांच्याकडून 30 हजार रुपये तीन टक्के व्याजाने पैसे घेतले. दोघांच्या मध्यस्थीने ऑक्‍टोबर 2018 मध्ये 45 हजार रुपये देऊन व्यवहार संपवण्यात आला.

मात्र, बुधवारी मंजुळा यांचा मुलगा रोहितने व्यवहारातील 17 हजार 400 रुपये देण्याचा तगादा लावत, लाकडाने उपहारगृहातील काचेचे काऊंटर फोडले. पंधरा-वीस हजारांचे नुकसान झाले आहे. मंजुळा व रोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस एस. एस. माळी तपास करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com