खासदार आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

सुदाम बिडकर 
गुरुवार, 10 मे 2018

पारगाव - धामणी ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी आयोजीत महाआरोग्य शिबिरामध्ये परिसरातील सुमारे 750 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषध उपचार देखील करण्यात आले. याबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख व पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी माहीती दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्र (धामणी), ग्रामपंचायत, डी.वाय. पाटील रुग्णालय (पिंपरी) व डॉ. प्रमोद कुबडे यांचे स्टार हॉस्पीटल यांच्या वतीने सर्वरोग तपासणी व निदान शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विठ्ठल जाधव होते. 

याप्रसंगी तालुकाप्रमुख सुनिल बाणखेले, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख शिवाजी राजगुरु, विजय आढारी, गणेश सांडभोर, रविंद्र वळसे पाटील, उल्हास काळे, खडकवाडीचे सरपंच अनिल डोके उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. रेश्मा शिंदे, डी.वाय. पाटील रुग्णालयाचे डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालिल डॉक्टरांचे पथक येथे होते. डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. शिवाजी थिटे यांनी सुमारे 750 रुग्णांची तपासणी करुन औषध उपचार केले. आवश्यक असणाऱ्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डी.वाय. पाटील रुग्णालयाचे जनसंपर्क आधिकारी रामदास गायकवाड यांनी सांगीतले. 

प्रास्ताविक सरपंच सागर जाधव यांनी केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, रविंद्र करंजखेले, विठ्ठल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार उपसरपंच वैशाली बोऱ्हाडे यांनी मानले. 

Web Title: Health Camp on the occasion of adhalrao patil's birthday