महिलांची आजार लपविण्याची वृत्ती मारक - डॉ. चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

गडहिंग्लज - आजाराबाबत स्त्री मौन बाळगून असते. आजार लपविण्याची तिची वृत्ती मारक आहे, असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले. स्त्रियांचे आजार हा राष्ट्रीय प्रश्‍न मानला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

‘सकाळ’ तनिष्का व्यासपीठ व मधुरांगणतर्फे मोफत हृदयरोग व मधुमेह तपासणी शिबिर झाले. याप्रसंगी डॉ. पाटील ‘स्त्रियांमधील हृदयरोग-एक संशोधन’ या विषयावर बोलत होते. दरम्यान केदारी रेडेकर पब्लिक स्कूलवर झालेल्या या शिबिरात १८० रुग्णांची तपासणी झाली. श्री सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटलच्या (शास्त्रीनगर, कोल्हापूर) सहकार्याने हे शिबिर झाले. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘उपवास, अवेळी जेवण, एकाच ठिकाणी बसून काम करण्याची पद्धत यामुळे रक्तवाहिन्या नाजूक होतात. त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची शारीरिक वाढ व संगोपन कमी होते. ही झीज भरून न येणारी असते. त्यामुळे पुरुषांपेक्षा पाच ते दहा वर्षे आधी स्त्रियांना आजार जडतात. पुरुषप्रधान संस्कृती व आजाराबाबत अज्ञानाची कोंडी फोडण्याची गरज आहे.’’ डॉ. पृथ्वीराज जाधव यांनी ‘अतिश्रम आणि दुर्लक्ष यामुळे स्त्रियांमध्ये निर्माण होणारे आजार’ या विषयावर मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. नगरसेविका व तनिष्का गटप्रमुख श्रद्धा शिंत्रे यांनी स्वागत केले. सौ. कोरी यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमांचे कौतुक केले. रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजना रेडेकर, ‘सकाळ’चे सहायक व्यवस्थापक (वितरण) अरुण भोगले उपस्थित होते. 

डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. पृथ्वीराज जाधव, डॉ. मानसी माळी, डॉ. मधुराणी तावसकर यांनी रुग्णांची तपासणी केली. मधुरांगण संयोजिका सुजाता माने, तनिष्का सदस्या शोभा शिंत्रे, माधुरी पाटील, अनिता शिंदे, ज्योती कुराडे, सुरेखा मुनिव, पल्लवी माने, दीपिका खामकर, माधुरी कुंभीरकर, सुनीता रेगडे, सुधा फाळके, शारदा सुतार, अनुसया सावंत, स्नेहल देसाई, आनंदी पाटील, भारती शिंदे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: health camp by tanishka, madhurangan