esakal | नागठाणेतील आरोग्य उपकेंद्रात पुरेसे कर्मचारी नाहीत

बोलून बातमी शोधा

The health sub-center in Nagthane is understaffed}

नागठाणे (ता. पलूस) येथील आरोग्य उपकेंद्र असून अडचण, नसुन खोळंबा झाले आहे. या उपकेंद्रात पुरेसे कर्मचारी नाहीत. गावात डेंगी आणि चिकनगुनियाचे रुग्ण रोज आढळून येत आहेत. तरीही या उपकेंद्रात सेवा उपलब्ध नाही. गावात किरकोळ मानधनावर राबणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी धावपळ करुनही रोज नवनवे रुग्ण आढळत आहेत. 

नागठाणेतील आरोग्य उपकेंद्रात पुरेसे कर्मचारी नाहीत
sakal_logo
By
महादेव अहिर

वाळवा : नागठाणे (ता. पलूस) येथील आरोग्य उपकेंद्र असून अडचण, नसुन खोळंबा झाले आहे. या उपकेंद्रात पुरेसे कर्मचारी नाहीत. गावात डेंगी आणि चिकनगुनियाचे रुग्ण रोज आढळून येत आहेत. तरीही या उपकेंद्रात सेवा उपलब्ध नाही. गावात किरकोळ मानधनावर राबणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी धावपळ करुनही रोज नवनवे रुग्ण आढळत आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत गाव पुढारी व्यस्त आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणाला वेळ नाही. शिवाय आधीच ग्रामपंचायतीत प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे ही मर्यादा येत आहेत. 
नागठाणे येथील लोकसंख्या सुमारे दहा हजारावर आहे. वास्तविक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र गरजेचे आहे. ते दुरच आहे त्या उपकेंद्रात लोकांना सेवा द्यायला यंत्रणा नाही. गावात आशा स्वयंसेविका आहेत. मुख्य आरोग्य केंद्राच्या काही सुचना येतील त्यानुसार या स्वयंसेविका गावात विविध पातळीवर सर्वेक्षण करतात. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी तात्पुरती एक जागा आरोग्य उपकेंद्रात भरली होती. तीही खाली झाली आहे. सध्या कत्राटी पध्दतीने रुग्णालयीन कामकाजासाठी एक आरोग्य सेवक नियुक्त केलेला आहे. मात्र त्यातुन आशा स्वयंसेविकाना पुर्ण वेळ कामात मदत अथवा मार्गदर्शन होत नाही. गोरगरीब रुग्णांना त्याचा त्रास होत आहे. या उपकेंद्रात लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य विभागाने कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार