पारनेरमध्ये लवकरच हेल्थ वेलनेस सेन्टर

मार्तंड बुचुडे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पारनेर - राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंर्गत राज्य सरकराने अविकसीत व आरोग्यसुविधा कमी असणा-या राज्यभरातील 17 जिल्ह्यात आरोग्य वर्धिणी केंद्र (हेल्थ वेलनेस सेन्टर) स्थापऩ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात या जिल्ह्यातील निवड झालेल्या गावात एक स्वतंत्र आरोग्य अधिकारी नेमला जाणार आहे. त्या साठी नव्याने त्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या मुळे पुढील काळात दुर्गम व ग्रामिण भागात निवड झालेल्या गावातील गरीब व सामान्य जनतेला मोफत आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत.

जनतेला आरोग्याच्या सुविधा देणे सरकाचे कर्तव्य आहे. याची जाणीव ठेऊन राज्य सरकारने आरोग्य वर्धिणी केंद्र ऊभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्या जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधांची कमतरता आहे, तसेच ज्या ठिकाणी  आरोग्याच्या सुविधांची गरज आहे, अशा जिल्ह्यातील काही गावांची निवड केली आहे. या केंद्राच्या सुविधेमुळे गोरगरीब व सामान्य जनतेची आरोग्याच्या बाबत होणारी हेळसांड या पुढील काळात थांबणार आहे. या केंद्रासाठी राज्यातील 17 जिल्ह्यातील सुमारे 70 तालुक्यांची निवड झाली असून या तालुक्यातून एक हजार 336 गावांची निवड केली आहे.

या केंद्रासाठी किमान एम.बी.बी.एस. पदवी धारक डॉक्टरांची नेमणुक करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना एक सहा महिण्यांचे प्रशिक्षण पुर्ण करावे लागणार आहे. तसेच त्यांना प्रशिक्षण पुर्णतेनंतर एक परीक्षा द्यावी लागणार आहे त्या परीक्षेत ते य़शस्वी झाल्यानंतरच त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाचीच असणार आहे अशी  अटही घातली आहे. या प्रशिक्षण काळात दहा हजार रूपये शिक्षण भत्ता देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात केंद्रावर नियुक्ती झाल्यानंतर 25 हजार रूपये पगार व सुमारे 15 हजार रूपयांपर्यंत प्रोहत्सान भत्ताही देण्यात येणार आहे.

आरोग्य वर्धिणी केंद्र मंजूर जिल्हे-17, एकूण तालुके- 70, या तालुक्यात एकूण सुरू करण्यात येणारी केंद्र-1336.

मंजूर झलेल्या जिल्हांची नांवे व तालुक्यांची संख्या (कंसात त्या जिल्ह्यात मंजूर झालेली केंद्र ) गडचिरोली-12(238), ऊस्मनाबाद-4(78), नंरबार-6(177), वाशिम-6(108), वर्धा-3(41), भंडारा-6(25), सातारा-3(47), चंद्रपूर-9(50), सिंधदुर्ग-4(80), नांदेड-4(60),जळगाव1(26), लातूर-1(33), हिंगोली-5(131), पालघर-4 (135), गोंदिया-1 (47 ), पुणे-1(25) व नगर- 1 (35) 

नगर जिल्यातील फक्त पारनेर तालुक्यातील गावांचीच  आरोग्य वर्धिणी केंद्रासाठी 35 गावांची निवड झाली आहे. तालुक्यातील या गावात अता लवकरच अशी आरोग्य वर्धिणी केंद्र स्थापऩ होणार आहेत.

Web Title: Health Wellness Center in Parner soon