नैसर्गिक रंगात आरोग्यदायी रंगपंचमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कोल्हापूर - नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी व्हावी, यासाठी निसर्गमित्र संस्था गेली काही वर्षे प्रबोधन घडवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही नैसर्गिक रंग निर्मिती व नैसर्गिक रंग वापरास प्रोत्साहन या उद्देशाने नैसर्गिक रंग लेपन स्पर्धा घेण्यात आल्या. वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून आरोग्यदायी रंगपंचमी साजरी करण्यात आली. प्रणीत उदय साळोखे व अगत्या अविनाश शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावले. 

निसर्गमित्र संस्था व नाइस प्ले ग्रुप यांच्या वतीने येथील बेलबागेत स्पर्धा झाल्या. निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी संयोजन केले. 

रंगाने चेहरा व शरीर रंगवा, अशी संकल्पना घेऊन स्पर्धा झाली. शाळकरी मुलामुलींनी कोणी फुलांचे, कोणी झाडांचा तर कोणी पाण्याविषयी जागृती करणारी चिन्हे, काहींनी विविध पारंपरिक मुखवटे अशा आशयाची नक्षी नैसर्गिक रंगाद्वारे चेहऱ्यांवर शरीरावर साकारली. स्पर्धेसाठी नैसर्गिक रंगच वापरायचे असल्याने अनेकांनी गेल्या काही महिन्यांपासून घरातील निर्माल्य, भाजीपाला, फळांच्या साली साठवून, वाळवून त्यांची भुकटी बनवून रंग तयार केले. अनेक फुले व झाडांच्या सालीमध्ये असलेले औषधी गुणधर्म त्या निमित्ताने त्वचेवर लावले गेले. यात हळकुंड, झेंडू, कडुनिंब, गुलाब, संत्री, चिक्कूच्या साली व पाला, फुलांपासून बनविलेल्या रंगात हिरवा, पिवळा, लाल, तपकिरी असे रंग तयार केले होते. 

एकूण 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात प्रेमा श्रीखंडे, वनिता चव्हाण, प्रवार पित्रे, राणिता चौगुले, अभय कोटनिस, पराग केमकर आदींनी सहभाग घेतला. 

इतर विजेते असे 
लहान गट- कुशल अमोल जगदाळे (द्वितीय), सिया संदीप खोत (तृतीय). 
खुला गट- अजय पद्माकर राऊत (द्वितीय), वरिष विक्रम चव्हाण (तृतीय), सक्षम रमेश लोखंडे, भार्गवी मोहन कारेकर, सर्वेशा अनिल बडगेरा (उत्तेजनार्थ). 

येथे मिळतील नैसर्गिक रंग... 
रासायनिक रंगामुळे शरीराला होणारे अपाय टाळण्यासाठी निसर्गमित्र जनजागृती करत आहे. त्यासाठी नैसर्गिक रंगांच्या वितरणाची सोयही निसर्गमित्र संस्थेने केली आहे. हे रंग दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, साईक्‍स एक्‍स्टेंशन, टाकाळा रोड येथे मिळणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल चौगुले यांनी केले.

Web Title: Healthy Holi with natural colors