इथे दार रविवारी भरणार शेतकऱ्यांचा होलसेल भाजीबाजार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

महाराष्ट्र -कर्नाटकच्या सिमारेषेवर असणाऱ्या चाबुकस्वारवाडी ( ता. मिरज) येथील शेतकरी ढबू मिरची, वांगी, गवारी, मेथी, कोथिंबीर, वरणा, फ्लॉवर आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादीत केला जातो. त्यामुळे येथील भाजीपाला उत्पादकांनी रविवार (ता.9) पासून प्रत्येक रविवारी सायंकाळी पाच वाजता भाजीपाल्याचा होलसेल बाजार भरविणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. 

सलगरे : महाराष्ट्र -कर्नाटकच्या सिमारेषेवर असणाऱ्या चाबुकस्वारवाडी ( ता. मिरज) येथील शेतकरी ढबू मिरची, वांगी, गवारी, मेथी, कोथिंबीर, वरणा, फ्लॉवर आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादीत केला जातो. त्यामुळे येथील भाजीपाला उत्पादकांनी रविवार (ता.9) पासून प्रत्येक रविवारी सायंकाळी पाच वाजता भाजीपाल्याचा होलसेल बाजार भरविणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. 

सलगरे येथील सोमवारी अथवा अन्य गावातील आठवडा बाजार भल्या पहाटे भरत असल्याने भाजीपाला उत्पादकांचे हाल सूरु होते. ते हाल थांबविण्यासाठी आणि गावातील गवारी व अन्य भाजीपाला व फळभाज्या उत्पादकांना गावातच तेही सोयीच्या वेळेत मालाची व्यापाऱ्यांना होलसेल विक्री करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

चाबुकस्वारवाडी व परिसरात इतर भाजीपाला आणि विशेषतः गवारी आणि ढबू मिरची, वांगी उत्पादक जास्त प्रमाणात असल्याने त्यांना सोमवारी पहाटे पाच साडेपाच वाजता सलगरे येथील बाजारात होलसेल विक्रीसाठी मळाभागातून उत्पादकांना यावे लागते. तत्पूर्वी रविवारी गवारी दिवसभर काढणी करावी लागते.

रविवारी जवळपास कोणताच बाजार नसल्याने त्या घरी पसरून ठेवाव्या लागत आणि दुसऱ्या दिवशी ग्लेझिंग कमी झाले असताना द्यावे लागत होते. त्यामुळे दरही एक दोन रुपये कमी मिळायचा. यावर पर्याय म्हणून गावातच रविवारी सायंकाळी पाच वाजता हा होलसेल बाजार भरवण्यात येणार असल्याची येथील ग्रामपंचायत व संयोजकांनी माहिती दिली. उद्या ( ता.9) बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार असून विविध व्यापाऱ्यांनाही याबाबत विनंती व आवाहन करण्यात आले आहे. 

सर्वांचा पुढाकार 
चाबुकस्वारवाडी येथील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जातो. मात्र, परीसरात भरणारे बाजार पहाटेच्या वेळेत भरत असल्याने महिलांना या वेळेत जाणे शक्‍य नसल्याने आणि दरही कमी मिळत असल्याने वेळ,पैसा,आणि ताजा भाजीपाला विक्री करता यावा यांसाठी परीसरातील भाजीपाला शेतकऱ्यांच्यासाठी बाजार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व परिसरतीाल सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hear Every Sunday Farmers will hold wholesale vegetable market