कोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

अनिकेत कोथळे आणि त्याचा मित्र अमोल भंडारे दोघांना गतवर्षी 6 नोव्हेंबरला जबरी चोरीचा गुन्हा पोलिसांत आणले. त्याच दिवशी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला बेदम मारहाण केली.

सांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण याप्रकरणातील संशयीतांनी अद्यापही वकिल दिलेली नाहीत, त्यामुळे सुनावणी लांबण्याची शक्‍यता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज वर्तवली. हिवरे तिहेरी खून खटल्यासाठी ते सांगलीत आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

अनिकेत कोथळे आणि त्याचा मित्र अमोल भंडारे दोघांना गतवर्षी 6 नोव्हेंबरला जबरी चोरीचा गुन्हा पोलिसांत आणले. त्याच दिवशी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अनिकेतचा मृतदेह आंबोलीच्या जंगलात नेऊन जाळला होता. हा प्रकार 8 नोव्हेंबरला उघडकीस आला. त्यानंतर याप्रकरणाचा खटाला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. वकिल निकम यांना आज सीआयडीकडून प्रकरणाचा आढवा घेतला. सीआयडीने दाखल केले दोषारोपपत्र व जबाब याचाही आढावा घेतला. ते म्हणाले, "कोथळे प्रकरणाची सर्व माहिती घेतली आहे. गुन्ह्यातील सातही संशयितांनी अजूनही वकिल दिलेला नाही. त्यामुळे सुनावणी झालेली नाही.'' 

प्रलंबित खटल्यांबाबत बोलतांना अॅड. निकम म्हणाले, "राज्यात अनेक खटले प्रलंबित आहेत. न्यायाधीची संख्या कमी असल्याने हे प्रमाण वाढले आहे. सर्वोच्चन्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायाधीची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे प्रलंबित गुन्हे मार्गी लागतील.'' दरम्यान अनिकेत कोथळेचे बंधू आशिष आणि अमित यांनी अॅड. निकम यांची भेट घेतली. हा खटला जलगती न्यायालयात चालवावा. जेणेकरुन आमच्या कुटूंबाला लवकर न्याय मिळेल, अशी मागणी त्यांनी केली. 

'आसाराम'ची शिक्षा योग्यच - अॅड. निकम 
आसारामला आजन्म तुरुंगात ठेवण्याच्या निर्णयावर अॅड. निकम म्हणाले, "मनुष्य मोठ्या पदावर गेल्यानंतर आपले कोण काही करू शकणार नाही असे त्याला वाटत असते. त्यातूनच अन्याय, अत्याचार आणि गुन्हे वाढतात. संत म्हणवणाऱ्यांनी जर अशी कृत्ये केली, तर काय आदर्श राहणार? आशा गन्हेगारांना कडक शिक्षा होते हे योग्यच आहे.'' 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Hearing of Kothale Case on Delay Says Ujjwal Nikam