नोटाबंदीविरुद्ध याचिकेवर सोमवारी होणार सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोल्हापूर - नोटाबंदीविरोधात देशभरातील जिल्हा बॅंकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील एकत्रित सुनावणी सोमवारी (ता. 5) होणार आहे. त्या त्या राज्यातील उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयात एकत्र केल्या.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरपासून जुन्या 500 व 1000 च्या चलनी नोटा रद्द केल्या. सुरवातीला या नोटा स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा बॅंकांना दिले; पण अचानक रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांना नोटा न स्वीकारण्याचे आदेश दिले. जिल्हा बॅंकांत काळा पैसा पांढरा होत असल्याचा संशय आल्याने हा निर्णय झाला. दरम्यानच्या मुदतीत जिल्हा बॅंकांकडे कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या.

जमा झालेल्या या नोटा चेस्ट करन्सी बॅंका स्वीकारायला तयार नाहीत आणि जिल्हा बॅंकेला पैसेही दिले जात नाहीत. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाविरोधात देशभरातील बहुंताशी जिल्हा बॅंकांनी आपआपल्या राज्यातील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा बॅंकांनी मिळून एकच याचिका दाखल केली होती. देशभरातील या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयात एकत्र करण्यात आल्या. यावरील पुढील सुनावणी सोमवारी (ता. 5) होणार आहे.

Web Title: The hearing will be held on a petition filed Monday against notabandi