रोज मांसाहार करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका

रोज मांसाहार करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका

कोल्हापूर - अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू झाले आणि लक्षात आले, त्याची हृदयाकडे जाणारी एक रक्तवाहिनी शंभर टक्के बंद झाली; पण त्या तरुणाची जीवनशैली डॉक्‍टरांनी पाहिली असता तो गेली दहा वर्षे रोज सकाळ संध्याकाळी फक्त मांसाहारी जेवणच घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. 

या संदर्भात हृदयरोग उपचार विभागाचे डॉ. अक्षय बाफना यांनी सांगितले की या तरुणाला पाच-सहा दिवसांपूर्वी चिंताजनक अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा धक्का बसलेला रुग्ण पाहून आम्हीही त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू केले. त्याच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी केली असता त्यातील एक वाहिनी १०० टक्के ‘ब्लॉक’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अँजिओप्लास्टी व्यवस्थित झाली. तरुणाची प्रकृतीही पूर्वस्थितीवर आली, मात्र २४ व्या वर्षी तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराचा झटका कसा आला असेल याचा नेमका अभ्यास करण्याचा आमचा प्रयत्न सुरू झाला. आम्ही रुग्ण व त्याच्या नातेवाइकांशी चर्चा केली. त्यावेळी गेली दहा वर्षे हा तरुण सकाळ संध्याकाळी जेवणात मांसाहारलाच प्राधान्य देत होता, असे लक्षात आले. याशिवाय या तरुणाच्या शरीराला कधीही व्यायाम नव्हता. त्यामुळेच त्याच्या रक्तात कोलॅस्टॉलचे प्रमाण वाढले, या शक्‍यतेला बळ आले. आता या तरुणाची प्रकृती बरी आहे, मात्र त्याने आहार विहारात खूप काळजी घेणे आवश्‍यक असल्याचेही डॉ. बाफना यांनी सांगितले. 

मांसाहाराबरोबरच व्यायाम गरजेचा
योग्य प्रमाणात मांसाहार फारसा अपायकारक नाही, पण वारंवार मांसाहार करत राहिलो, तर ते अपायकारक आहे. याबरोबरच रोज किमान ४० मीिनटे चालण्याचा व्यायाम आवश्‍यकच आहे. याशिवाय हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, फळे याचा आहारात वापर आवश्‍यकच आहे. मांसाहार जरूर चरचरीत आहे, पण तो आहार नियंत्रितच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com