कोयना परिसरात मुसळधार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासांत जलाशयात दीड टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली. कोयना जलाशयात एकूण 27.65 टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणीपातळी 2071.09 फूट झाली आहे. जलाशयात सात हजार 313 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. 

रविवारी रात्रीपासून संततधार पावसास सुरवात झाली. सोमवारी रात्रीही मुसळधार पाऊस झाला. कोयना विभागातील ओढे-नाले भरून वाहत होते. 

गेल्या 24 तासांतील पाऊस  (मिलिमीटरमध्ये)  
कोयनानगर 154 
नवजा 117 
महाबळेश्‍वर 74 

Web Title: Heavy rain in the Koyna dam area