चंदगड, हेरे परीमंडलमध्ये सलग पाच दिवस अतिवृष्टी 

सुनील कोंडुसकर
गुरुवार, 11 जुलै 2019

चंदगड : शनिवार ते बुधवार (ता. 6 ते 10) सलग पाच दिवसात चंदगड व हेरे परीमंडलध्ये तर तर तुर्केवाडी मंडल क्षेत्रात सलग चार दिवस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पाच दिवसात हेरे क्षेत्रात दररोज 100 मिली मीटरहून अधिक पाऊस पडला. एका दिवशी तब्बल 201 मिली मीटरची नोंद झाली. हेरे क्षेत्रात पाच दिवसात 719 मिली मीटर पाऊस झाला.

चंदगड : शनिवार ते बुधवार (ता. 6 ते 10) सलग पाच दिवसात चंदगड व हेरे परीमंडलध्ये तर तर तुर्केवाडी मंडल क्षेत्रात सलग चार दिवस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पाच दिवसात हेरे क्षेत्रात दररोज 100 मिली मीटरहून अधिक पाऊस पडला. एका दिवशी तब्बल 201 मिली मीटरची नोंद झाली. हेरे क्षेत्रात पाच दिवसात 719 मिली मीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ तुर्केवाडी क्षेत्रात 518, चंदगड 366, नागनवाडी 306, माणगाव 144 तर सर्वात कमी पाऊस कोवाड क्षेत्रात 106 मिली मीटर नोंदवला गेला. अतिवृष्टीमुळे पश्‍चिम भागात घरांची पडझड होऊन सव्वा चार लाख रुपयांचे नुकसान झाले. 

कोकण सीमेवर असलेला तालुक्‍याचा पश्‍चिम भाग अति पर्जन्यछायेखाली येतो. नैऋत्य मोसमी वारे पाण्याने भरलेल्या ढगांना घाटमाथ्यावर ढकलतात तेव्हा पारगड, इसापूर, तिलारीनगर, हेरे, पाटणे, जांबरे, कानूर, चंदगड, नागनवाडी पासून ते मधल्या पट्यात तुर्केवाडीपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी होते. जांबरे, हेरे, कानूर परिसरात तर सर्वाधिक पाऊस पडतो. पूर्वी चंदगड या तालुक्‍याच्या ठिकाणी एकच पर्जन्यमापक असल्यामुळे चंदगड परिक्षेत्रात पडणारा पाऊस हा तालुक्‍याचा पाऊस गृहीत धरला जात होता. मात्र दोन वर्षापासून प्रत्येक मंडल कार्यालयाच्या ठिकाणी पर्जन्यमापक बसवून त्याची नोंद घेतली जाऊ लागली. त्यानुसार हेरे हे सर्वाधिक पावसाचे केंद्र असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यापाठोपाठ तुर्केवाडी, चंदगड, नागनवाडी, माणगाव व कोवाडचा क्रमांक लागतो. गेले पाच दिवस तालुक्‍यात जोरदार पाऊस सुरु असून चंदगड व हेरे मंडलमध्ये हे पाचही दिवस अतिवृष्टी झाली आहे. तुर्केवाडी मंडलमध्ये 10 तारीख वगळता तत्पूर्वीचे चार दिवस सलग अतिवृष्टी झाली आहे. नागनवाडीला 10 तारखेला अतिवृष्टी झाल्याचे दिसते. तालुक्‍याची सरासरी विचारात घेता 8 ते 10 तारखेपर्यंत सलग अतिवृष्टी आहे. 6 तारखेला तीन मिली मीटरने तर 7 तारखेला अवघ्या एक मिली मीटरने अतिवृष्टीची आकडेवारी हुकली आहे. दरम्यान या पाच दिवसात दहा घरांची पडझड होऊन 4 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. हेरे, पाटणे, जेलुगडे, तुर्केवाडी या अतिपावसाच्या भागात ही पडझड झाली आहे. 

आठ किमीच्या अंतरात दुप्पट पाऊस.... 
चंदगड ते हेरे हे अंतर आठ किलो मीटर आहे. हवाई अंतर काढल्यास ते आणखी कमी भरेल. परंतु एवढ्या अंतरात पावसाचे प्रमाण दुप्पट आहे. पाच दिवसात हेरे परीक्षेत्रात 719 मिली मीटर तर चंदगड परीक्षेत्रात 366 मिली मीटर पाऊस झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Chandgad Here region