चांदोली पाणलोटात मुसळधार पाऊस 4400 क्‍युसेकने पाणी सोडले  वारणा काठावर सतर्कतेचा इशारा 

विष्णू मोहिते
Thursday, 6 August 2020

सांगली ः चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे गुरुवारी दुपारी तिन वाजल्यापासून 4400 क्‍युसेक्‍सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठावरील गावे व नागरिकांना सकर्त राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

सांगली ः चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे गुरुवारी दुपारी तिन वाजल्यापासून 4400 क्‍युसेक्‍सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठावरील गावे व नागरिकांना सकर्त राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिला तर कोयना, चांदोलीतून सायंकाळपासून विसर्ग सुरु करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. चांदोली धरणातून दुपारी तीन वाजल्यापासून 4400 क्‍सुसेक्‍सने विसर्ग सुरु झाला आहे. तर कोयना धरणातुनही दोन ते 5 हजार क्‍युसेकने विसर्ग केला जाईल, असे प्रशासनाने जाहिर केले आहे. दरम्यान, चांदोली धरण परिसरात आज तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी आठ वाजेपर्यंत 165 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी गेल्या 24 तासात 10 फुटावरुन 22 फुटापर्यंत वाढली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन टीम दाखल झाल्या आहेत. त्यातील एक सांगलीत तर दुसरी टीम आष्टा येथे आहे. 

पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. कोयना परिसरात गेल्या 24 तासात 202 मिलिमिटर पाऊस पडला. महाबळेश्‍वरला 183 आणि नवजाला 235 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात 81 हजार 64 क्‍युसेक पाणी गोळा झाले आहे. 
.................................. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Chandoli watershed released 4400 cusecs of water Warning alert on Warna edge