हिरण्यकेशी पात्राबाहेर; गडहिंग्लजमधील तीन बंधारे पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

गडहिंग्लज - शहरासह तालुक्‍यात आणि आजरा, आंबोली परिसरातील जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी तालुक्‍यातील निलजी, ऐनापूर, नांगनूर (गोटूर) हे तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असून दिवसभर जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने चार दिवसापासून चांगलीच हजेरी लावली आहे. दोन दिवसापासून तर जोरदार पाऊस कोसळत आहे. आजरा व आंबोली भागातही मुसळधार पाऊस असल्याने हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. शिवाय चित्री मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून प्रति सेकंद एक हजारावर क्‍युसेकने पाणी नदीत येत आहे. यामुळे नदी पात्राबाहेर पडली असून निलजी, ऐनापूर, नांगनूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

निलजी, नांगनूर मार्ग बंद झाल्याने पूर्व भागातील वाहतूक पर्यायी भडगाव, जरळी पुलावरून सुरू आहे. ऐनापूर मार्गही बंद झाल्याने पार्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. गेल्या महिन्यात याच दरम्यान महापूराने कहर केला होता. या महिन्यात पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याच्या भितीने नदीकाठची गावे गर्भगळीत झाले आहेत. महापुरातून सावरून सुरळीत संसार सुरू असताना महिन्याभरातच पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे नागरिक भितीच्या छायेत आहेत. ऑगस्टमधील महापुरात नदीकाठच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा पूर आल्याने उरले सुरले पिकही हातचे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Gadhinglaj flood to Hirnyakeshi river