Video : निपाणी परिसरात ढगफुटी 

Heavy Rains in Aadi Nipani
Heavy Rains in Aadi Nipani

निपाणी - शहरासह भागातील अनेक गावात रविवारी (ता. 20) दुपारी ढगफुटी झाली. ढगफुटीने सुमारे दोन तास झालेल्या तुफानी पावसाने गावागावातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते. आडी, बेनाडी, नांगनूर या गावात वाहने वाहून गेली.

बेनाडीत पावसाच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एकाला तरूणांनी वाचविले. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले तर ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले. यमगर्णी, सौंदलगा, जत्राट, मांगूर, कुन्नूर, कोगनोळी, कोडणी, लखनापूर परिसरालातील ओढ्याचे बांध फुटल्याने नुकसान झाले. यामुळे भागातील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. नजिकचा डोंगरी भाग व शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात पाऊस धो - धो बरसला. भिवशीसारख्या गावांमध्ये घराघरात पाणी शिरले. घरांत दीड - दोन फूट पाणी साचल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. घरातील पाणी पातळी वाढल्याने अनेकजण घरातून बाहेर पडले.

जनावरांच्या गोठ्यातही पाणी शिरल्याने पावसाचा जनावरांनाही फटका बसला. आडी येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहने उलटल्याची घटना घडली. भर पावसाळ्यात जेवढा पावसाला जोर नव्हता, तेवढा जोर आज निपाणी भागाने अनुभवला. अनेक वर्षात असा तुफानी पाऊस झाला नसल्याचे जाणकार शेतकरी, नागरिकांनी सांगितले.

आडीत ढगफुटी
आडी येथे ढगफुटी झाल्याने वाहने वाहू गेली. ग्रामपंचायती नजिक असणाऱ्या ओढ्याला पाणी आल्याने आडी गावात जाणारा रस्ता बंद झाला. आडी गावातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते. गावच्या वेशीत असणाऱ्या नाईक किराणा दुकानाजवळील तीन चार चाकी वाहने पाण्यात वाहून गेली. प्रवाहाच्या दाबाने एका वाहनावर दुसरे वाहन जाऊन आदळले. दोन्ही वाहने ओढ्याला जाऊन तटली. दोन मोटार सायकली देखील वाहून गेल्या. त्या तरूणांनी पाण्यातून बाहेर काढल्या. आडीत आत्तापर्यंत असा कधी पाऊस झाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रात्री निपाणी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

भिवशीत पावसाची मुसंडी
भिवशीत रविवारी (ता. 20) सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यावर जवळपास दोन फूट पाणी आले. बघता-बघता घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. घरांत फूट-दीड फूट पाणी साचल्याने संसारोपयोगा साहित्याचे नुकसान झाले. घरातील पाणी पातळी वाढल्याने अनेकजण घरातून बाहेर पडले. जनावरांच्या गोठ्यातही पाणी शिरल्याने पावसाचा जनावरांनाही फटका बसला. ऑगस्टमध्ये भिवशी अख्खे गाव पुरात अडकले होते. त्यानंतर दोन दिवसात पुन्हा पावसाचा जो वाढला आहे. आज ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने दुसऱ्यांदा पूर आल्याची गावकऱ्यांना प्रचिती आली. गावातील नदीची पाणी पातळी वाढलेली नसली तरी जोरदार पावसाने गाव पाण्यात गेले.

बेनाडीत एकाला वाचविले
आज रविवारी (ता. 20) पावसाने बेनाडी परिसराला झोडपून काढले. सायंकाळी ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाच्या प्रवाहाच्या जोराने वाहून जाणाऱ्या मोटार सायकलस्वाराला तरूणांनी वाचविले. रविवारी पहाटे सुमारे तीन तास दमदार पाऊस झाल्याने गावात सर्वत्र पाणीच-पाणी झाले. पुन्हा दुपारी 4 वाजल्यानंतर येथे जोरदार पाऊस झाला. ऑक्‍टोबरचा पंधरवडा उलटला तरी पावसाने पाठ न सोडल्याने येथील शेतकरी, नागरिक हैराण झाले आहेत. शेती, शिवारात पाणी थांबून राहिले असून पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com