पाणी भरल्याने कऱ्हाडमधील नागरिक स्थलांतरीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कऱ्हाड : कोयना धरणातून पाणी सोडल्याने कोयना व कृष्णा नदीच्या पाण्यांची पातळी वाढली आहे. शहराच्या अनेक नागरी भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे शहरातील वीसहून अधिक कुटूंब स्थलांतरीत करण्यात आली आहेत. 

कऱ्हाड : कोयना धरणातून पाणी सोडल्याने कोयना व कृष्णा नदीच्या पाण्यांची पातळी वाढली आहे. शहराच्या अनेक नागरी भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे शहरातील वीसहून अधिक कुटूंब स्थलांतरीत करण्यात आली आहेत. 

मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना नदीचे पाणी शहरातील नागरी भागात शिरले आहे. पाटण कॉलनी येथील सहा झोपडी वजा घरांमध्ये पाणी शिरल्याने त्या कुटूंबाचे स्थलांतर करम्यात आले आहे. पालिकेची शाळ क्रमांक तीन मध्ये त्यांची सोय करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पालिकेच्या मदतीने पंचवीस नागरीकांचे स्थलांतर झाले आहे. पालिकेने शाळा क्रमांक तीन बरबोरच नऊ व दोन क्रमांकाच्या शाळाही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राखीव ठेवल्या आहेत. पालिकेच्या आपत्ती व्यवस्तापनाचे पथकही तयारीत आहे.

कोयना दरणाचे दरवाजे साडे चौदा फुटाने वाढविण्यात आले आहेत. कोयनेते येणाऱ्या पाण्यामुळे येथील कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. नागरीकांना 2005 व 2006 साली झालेल्या पावसाची व पुराची आठवण होत आहे. शहरातील महत्वाच्या भागात पाणी शिरण्याची संभाव्य भिती लक्षात घेवून पालिका व महसूल विभागाने मोठी खबरदारी घेतली आहे. तरिही शहरातील पाटण कॉलनी येथील सहा ते सात घरात पाणी शिरले आहे. तेथे झोपडी वजा घरे आहेत. त्या प्रत्येक घराला धोक्याचा इशारा देण्यात आला होता. दुपारी चारच्या सुमारास तेथे कोयना नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली. त्यामुळे त्या काठावरील सुमारे सहा घरात पाणी शिरले. त्यांना त्वरीत सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्या नागरीकांना सानुग्रह अनुदानासह अन्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पालिकेच्या येथील शाळा क्रमांक तीन व नऊमधील काही खोल्या पुरग्रस्तांसाठी आपत्कालीन सुविधा म्हणून राखून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुरग्रस्त स्थलांतारीत लोकांची सोय करण्यात येणार आहे.

कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेवून शहरातील आपत्ती व्यवस्थापन तयारीत आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तीस फुट सात इंचाची आहे. येथे सुमारे 83 हजार 555 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना नदीत सुमारे 52 हजार 421 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्याची उंची 98 फुट ६ इंच आहे. दोन्ही नद्यांच्या पुराची पातली ४५ फुट आहे. कोयनेची इशारा पातळी 40 फुट तर कृष्णेची पातळी 40.50 फुट आहे. कोयनेतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे कोयनेच्या पाणी पातळीत तर दोन तासांनी किमान दोन फुटाने वाढत आहे. त्यामुले शहरातील अनेक भागात पाणी शिरत आहे. पुरस्थिती शहरात निर्माण होत आहे. त्यामुळे सासनही जागृत राहिले आहे. प्रांताधिकारी हिमम्त खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तलाठी जंगम यांच्यासह नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, पालिकेचे नगरअभियांता एम. एच. पाटील आरोग्य विभागगाचे कर्मचारी नदी काठावर फिरून स्थितीचा आढावा गेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy raisn in Karhad