अवजड वाहनाने वीजतारा तोडल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

बालिकाश्रम रस्त्यावरील सावेडी गाव ते फुलारी पेट्रोल पंपादरम्यानच्या रस्त्यावर अवजड वाहन थेट विजेच्या खांबावर आदळले. त्यामुळे गेल्या काही तासांपासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 
 

नगर : बालिकाश्रम रस्त्यावरील सावेडी गाव ते फुलारी पेट्रोल पंपादरम्यानच्या रस्त्यावर अवजड वाहन थेट विजेच्या खांबावर आदळले. त्यामुळे गेल्या काही तासांपासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

अवजड वाहतुकीबाबत आज परिसरातील नागरिकांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की बालिकाश्रम ते सावेडी गाव रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याने त्यावर वाहतूक वाढली आहे. दिवसभर आणि रात्रीही ट्रक आणि डंपर मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत.

आठवड्यापासून रस्त्यावर कंटेनर व अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री कंटेनर थेट विजेच्या खांबावर जाऊन आदळला. त्यामुळे वीजतारा तुटून मोठे नुकसान झाले, तर गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील वीजपुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे बालिकाश्रम ते सावेडी गाव रस्त्यावरील अवजड वाहतूक तत्काळ थांबवावी आणि पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. निवेदनावर स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, डॉ. सुंदर गोरे, डॉ. शंकर शेळके, नितीन वाकळे, सुरेश वाकळे, संजय वाकळे, प्रतीक शहा, राहुल विदळकर, संतोष कदम, किरण गायकवाड, प्रसाद काळे, स्वप्नील शहा, रमेश गुंजाळ आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Heavy vehicle broke the electricity line