शिरवळ ते कऱ्हाड मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंदच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

या मार्गावर केवळ अत्यावश्यक सेवेची वाहतुक सुरु ठेवल्याची माहिती महामार्ग पाेलीसांनी दिली. 

सातारा :- पुणे बंगळूर महामार्गावरील शिरवळ ते कऱ्हाड या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही पुर्णतः बंद ठेवल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून देण्यात आली. या मार्गावर आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अवजड वाहनांची वाहतुक सोडण्यात आली होती. सकाळी सात वाजता या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. सध्या शिरवळ ते आनेवाडी या रस्त्यावर सुमारे पाचशे ते सहाशे वाहने उभी आहेत. या मार्गावर केवळ चार चाकी वाहनांची वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy vehicular traffic stopped from Shirwal to Karad