राज्यात 10 ठिकाणी होणार हेलिपॅड 

तात्या लांडगे
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी सांगितली. 

जालना, बीड, नंदूरबार, वाशिम, बुलढाणा, रायगड या जिल्ह्यांच्या ठिकाणी तर उर्वरित चार हेलिपॅड रायगड, मुंबई, ठाणे व पुणे येथील औद्योगिक क्षेत्रात उभारले जाणार आहेत. विमानसेवा सुरळीत नसलेल्या अथवा विमानसेवाच नाही, अशा भागात हेलिपॅड उभारण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी जिल्ह्याच्या मध्यवर्ती जागांची पाहणी करण्यात आली आहे. आगामी एक-दीड महिन्यात त्याचे काम सुरू होणार असून त्याच्या भाड्यातून प्राधिकरणाला फायदा होईल, असे काकाणी यांनी सांगितले. राज्यात उडाण योजनेंतर्गत आता सिंधुदुर्ग, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. लोहगाव विमानतळाची जागा अपुरी पडत असल्याने पुरंदरची जागा निश्‍चित केली असून नवी मुंबईची सेवाही दीड वर्षात सुरू होईल, असे काकाणी यांनी सांगितले. 

नागपूर व चंद्रपूरच्या तलावांतून जलवाहतूक 
विमानसेवेला पर्याय म्हणून नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या तलावांमधून जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तेथील तलावांचा सर्व्हे करण्यात आला असून तेथे बांधकाम कशा प्रकारचे करायचे याचे नियोजन सुरू आहे. ज्या-ज्या मोठ्या तलावांतील अथवा धरणातील पाणीसाठा स्थिर आहे, अशा ठिकाणी जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग-रत्नागिरी अशी जलवाहतूक सुरू केली जाणार आहे, जेणेकरून प्रवासी व मालवाहतूक सोयीस्कर होईल आणि वेळेत व खर्चात बचत होईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helipad will be held in 10 locations in the state