सोलापूरकरांमुळे मक्‍केतील तीर्थयात्रेकरी सुखरुप मायदेशी 

solapur
solapur

सोलापूर : सौदी अरब येथील मक्केच्या तीर्थयात्रेला गेलेले यात्रेकरू टुर्स कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तिथेच अडकून पडले होते. यात्रेकरूंना सोडविण्यासाठी सोलापुरातूनच चक्रे फिरविल्यानंतर या सर्वांना सोडण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले अन्‌ पाहता पाहता तब्बल 104 जण सुखरुप आपल्या घरी परतले आहेत. 

त्यांना निवाऱ्याची सोय होती ना त्यांच्याकडे खायची सोय होती, ना परतण्याचे विमान तिकीट होते. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सौदी अरेबियातील भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्या प्रयत्नामुळे त्यांची मायदेशी परतण्याची सोय झाली. तिथे अडकलेल्यांपैकी एकाने सोलापुरातील अश्‍पाक बळोरगी यांना फोन लावून त्यांच्याबरोबर झालेली सर्व हकीगत सांगितली. हे सर्व सिनियर सिटीजन होते. सोलापूरकरांच्या या एका फोनवरून त्यांना मायदेशी परत आण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरवातील चार जण असल्यानी माहिती मिळाल्यांनतर त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करताना लक्षात आले, की लातूर, उस्मानाबाद, बीड, अंबेजोगाई येथील यात्रेकरूंबरोबर अडीच हजार यात्रे करू तिथे फसले असल्याचे समोर आले. 
हजयात्रा ही विशिष्ट काळातच केली जाते तर उमरा ही तीर्थयात्रा वर्षभर कधीही केली जाते. त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यातून अनेक यात्रेकरू उमरा तीर्थयात्रेसाठी सौदी येथील मक्का-मदिना येथे गेले होते.

ही 15 दिवसांची तीर्थयात्रा होती. यामध्ये मक्का आणि मदिना येथे मुक्काम असा प्रवास असतो. तेथे गेल्यानंतर प्रथम मक्का येथील सात दिवस संपले आणि तेथील लॉजिंगवाल्यांनी मुदत संपल्याचे सांगून रूम चेकआऊट केली. असिल या टुर्स कंपनीचा जो सेवक व्यक्ती होतो तो तेथून निघून गेला होता. त्यांना राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, परतीचे तिकीटही नाही, यामुळे हे यात्रेकरू तिथेच अकडकून पडले. त्यातील काहीजण अक्कलकोट नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अश्‍पाक बळोरगी यांचे नातेवाईक होते. म्हणून त्यांनी बळोरगी यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ही माहिती दिली. यानंतर श्री. शिंदे यांनी सौदी अरब येथील भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्याशी संपर्क साधला. सोलापूरचे लोक तिथे अडचणीत असल्याचे सांगितले आणि सहकार्य करण्यास सांगितले. अहमद जावेद यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. प्रथम त्यांच्या राहण्याचे आणि जेवणाची सोय केली. यानंतर परतीची सोय केली. यानंतर हे सर्व यात्रेकरू आपल्या मायदेशी सुखरूप परतले आहेत. मंत्री सुशीलकुमार शिंदे, अश्‍पाक बळोरगी यांनी केले प्रयत्न, सौदी अरबमधील भारतीय राजदूत अहमद जावेद यांनी केली परतण्याची सोय झाली. 

सौदी अरब येथे उमराकरिता गेलेल्या माझ्या नातेवाइकांसह सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील अनेकांना टुर्स कंपनीकडून फसविल्याचे समोर आले. हे मला समजताच मी सुशीलकुमार शिंदे यांना माहिती दिली आणि मदतीची विनवणी केली. तेव्हा त्यांनी लगेच सौदी अरबमधील भारतीय राजदूत अहमद जावेद यांना फोनवरून माहिती दिली. यानंतर सोलापूरकरांमुळे अन्य जिल्ह्यातील यात्रेकरू मायदेशी सुखरूप परतले आहेत. 
- अश्‍पाक बळोरगी, विरोधी पक्षनेते, अक्कलकोट नगरपालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com