शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा : तहसीलदार बनसोडे

jeevan
jeevan

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील खरीप हंगाम 2018 मधे पेरणी झालेल्या तुर, मटकी व हुलगा या पिकासाठी आठ महसुली मंडलातील 6 हजार 748 शेतकऱ्यांना हेक्टरी 3 हजार 400 रुपया प्रमाणे 1 कोटी 71  लाख 10 हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

मोहोळ तालुका तसा रब्बीचाच ,परंतु पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने सन 2018 च्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर खरीप क्षेत्रावर तुर, मटकी व हुलगा या पिकांची पेरणी झाली होती. मात्र तालुक्यात सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने ही पीके जळुन गेली. अगोदरच पाऊस कमी व पेरणी केलेले क्षेत्र ही जळाल्याने शेतकरी मोठया अडचणीत सापडला आहे.

मोहोळ तालुक्यात पेनुर, सावळेश्वर, वाघोली, शेटफळ नरखेड, टाकळी सिकंदर, मोहोळ व कामती या महसुली मंडळांचा समावेश आहे. या मंडालात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी नुसार ही मदत वितरीत केली आहे. तहसील प्रशासनाने खरीपाच्या नुकसानीचा आठ कोटी रुपयाचा आराखडा तयार करून पाठविला होता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 104 गावात 52 हजार 869 खातेदार असुन आणखी शोध मोहिम सुरू आहे. या सर्वाना वार्षिक 6 हजार रुपये सन्मान निधी देण्याचे शासनाच्या विचाराधिन आहे, या पैकी 16 हजार 210 शेतकऱ्यांचे खाते क्रमांक संकलीत झाले आहेत, उर्वरीत काम प्रगती पथावर असल्याचे तहसीलदार बनसोडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com