kerala floods: केरळ पूरग्रस्तांसाठी विठ्ठल मंदिर समितीची मदत

अभय जोशी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पंढरपूर ः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून केरळ मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी जाहीर केला आहे. केरळमध्ये संकटात सापडलेल्या लोकांना सावरण्यासाठी या माध्यमातून विठूराया सरसावला असल्याचे मानले जात आहे.

केरळ मधील महापूरामुळे निसर्ग संपन्नतेने नटलेल्या केरळचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेथील जनजीवन कोलमडून पडले आहे. अनेक कुटुंबांची वाताहात झाली आहे. सुमारे 46 हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.तसेच दहा लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. सुमारे 1700 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. केरळ राज्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी देशपरदेशातून मदत पाठवली जात आहे. त्यामध्ये गोरगरीबांच्या मदतीला धावणारा विठूराया देखील मागे राहिलेला नाही.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने केरळ मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 25 लाख रुपये तातडीने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात या बाबतच्या वैधानिक गोष्टींची पुर्तता करुन हा निधी केरळ मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपुर्त करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या मदतीच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेला विठूरायाच केरळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Help of Vitthal Temple Committee for Kerala floods victims