हेरिटेज समिती स्थापनेची सोलापूर महापालिकेत प्रक्रिया सुरू 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

समितीसाठी यांची शिफारस 
अध्यक्षपदासाठी महापालिकेचे माजी आयुक्त तथा माजी प्रधानसचिव टी. सी. बेंजामिन यांच्या नावाची, तर सदस्यत्वासाठी प्राचीन इतिहास भारतीय पुरातत्त्व संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विनायक धुळप, आर्किटेक्‍चर अमोल चाफळकर, सीमांतिनी चाफळकर, सविता दीपाली, पुष्पांजली काटीकर, अजित हरिसंगम यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

सोलापूर : गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या हेरिटेज समितीच्या स्थापनेला मुहूर्त मिळाला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून महापालिकेचे माजी आयुक्त टी. सी. बेंजामिन यांना समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. 

राज्यातील औरंगाबाद, अमरावती, नांदेड, ठाणे, कल्याण-डोंबवलीसह सोलापूरसाठी हेरिटेज नियमावली करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे, नागपूर व कोल्हापूर महापालिकांनी नियमावली तयार केली आहे. सोलापूरला नियमावली करण्यासाठी महापालिकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. समिती स्थापनेचा मूळ प्रस्ताव 2000 मध्ये तयार झाला होता. शहरातील हेरिटेज इमारतींची यादी प्रसिद्ध करण्याबाबत सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानुसार कार्यवाही झाली नाही. सरकारने 18 फेब्रुवारी 2010 रोजी हेरिटेज इमारतींचे राजपत्र प्रसिद्ध केले. त्यातही सोलापूर शहरातील हेरिटेज वास्तूंचा समावेश नव्हता. समिती आणि जाहीर प्रसिद्धीकरणही करण्यात आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर इतिहासतज्ज्ञ, माहितीगार यांना पत्र देऊन बैठक बोलावण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार संबंधितांना पत्र पाठविण्यात आले. मात्र, पुढे त्याचे काहीच झाले नव्हते. आता हा विषय मार्गी लागण्याची शक्‍यता असून या संदर्भातील आवश्‍यक कार्यवाही सुरू झाली आहे. 

समितीसाठी यांची शिफारस 
अध्यक्षपदासाठी महापालिकेचे माजी आयुक्त तथा माजी प्रधानसचिव टी. सी. बेंजामिन यांच्या नावाची, तर सदस्यत्वासाठी प्राचीन इतिहास भारतीय पुरातत्त्व संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विनायक धुळप, आर्किटेक्‍चर अमोल चाफळकर, सीमांतिनी चाफळकर, सविता दीपाली, पुष्पांजली काटीकर, अजित हरिसंगम यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heritage committee in Solapur Municipal Corporation