सोलापुरात 115 हेरिटेज वास्तू

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 31 डिसेंबर 2018

राज्यातील औरंगाबाद, अमरावती, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह सोलापूरसाठी हेरिटेज नियमावली करून समिती स्थापन करण्यास शासनाने  2000 मध्ये मंजुरी दिली आहे. त्यानुसार समिती स्थापन करण्यासाठी इतर महापालिकांकडून माहितीही मागविण्यात आली. शहरातील हेरीटेज इमारतींची यादी करून ती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव पाठविला. मात्र अद्यापही या यादीला मंजुरी मिळाली नाही आणि
इमारतीची नावेही कागदावरच राहिली आहेत. 

सोलापूर : चार हुतात्म्यांची नगरी, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य उपभोगलेले शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहरात 115 हेरिटेज वास्तू असल्याचे आढळून आले आहे. त्याची यादी तयार झाली असून, हेरिटेज समिती स्थापन करण्यात महापालिकेने तब्बल 18 वर्षांपासून टाळाटाळ केली आहे. आताही हा विषय आयुक्तांनी मंजुरीसाठी पाठविला असताना काही जुन्या इमारती पाडण्यात हेरिटेज समितीची अडचण येऊ नये म्हणून हा विषय अजेंड्यावर घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.

राज्यातील औरंगाबाद, अमरावती, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह सोलापूरसाठी हेरिटेज नियमावली करून समिती स्थापन करण्यास शासनाने  2000 मध्ये मंजुरी दिली आहे. त्यानुसार समिती स्थापन करण्यासाठी इतर महापालिकांकडून माहितीही मागविण्यात आली. शहरातील हेरीटेज इमारतींची यादी करून ती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव पाठविला. मात्र अद्यापही या यादीला मंजुरी मिळाली नाही आणि
इमारतीची नावेही कागदावरच राहिली आहेत. 

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या यादीनुसार हेरिटेज इमारतींची तीन विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक विभागातील शासकीय इमारती,
सार्वजनिक-निमसार्वजनिक वापराच्या इमारती, सार्वजनिक ट्रस्टच्या वापरातील इमारती आणि खासगी वापरातील इमारती असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
हेरिटेज इमारतींचा दर्जा मिळालेल्या वास्तूंची निगा राखण्याची जबाबदारी संबंधित ट्रस्टची असणार आहे. यादीतील इमारतींमध्ये काही बदल करता येणार नाही.
शहरातील अनेक नामवंत संस्था आणि खासगी घरांचा समावेश यादीत आहे. 

शहरातील हेरिटेज वास्तूंची वर्गवारी
---------------------------
इमारतींची मालकी                 ग्रेड एक         ग्रेड दोन          ग्रेड तीन       एकूण
-------------------------------------------------------------------
शासकीय इमारती                   04             15              00            19
सार्वजनिक-नीमसार्वजनिक            06             09              02            17 
सार्वजनिक ट्रस्ट                    03             39              04            46 
खासगी                           03             18              12            33
--------------------------------------------------------------------
एकूण                            16             81              18           115
 

Web Title: Heritage places in Solapur