लपवून ठेवलेली बोट जाळली; शंभर ब्रास अवैध वाळू जप्त

राजशेखर चौधरी
बुधवार, 5 डिसेंबर 2018

अक्कलकोट : अक्कलकोट  तहसील कार्यालयाच्या फिरत्या पथकाने कुमठे येथे मंगळवारी रात्री 1 ते 2  च्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना रस्त्याच्या आतील बाजूस असलेल्या पाझर तलाव लगत वाळूसाठा व लपवून ठेवलेली बोट आढळून आली. सध्या सिना नदीला पाणी आल्यामुळे वाळू माफियांकडून नदीमध्ये बोट सोडून वाळू उपसा करण्याची तयारी चालू होती. ही बातमी तहसीलदार अंजली मरोड यांना मिळताच त्वरित त्यांनी महसूल पथकासह सदर ठिकाणी जाऊन छापा मारला. त्या ठिकाणी अवैध वाळूसाठा व बोट आढळून आले. संपूर्ण महसूल पथकाने मिळून सदर बोट जाळून सुमारे १०० ब्रास अवैध वाळू पकडले आहे.

सदर वाळूचा पंचनामा करून वाळूसाठा संबंधित पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कुमठे परिसरातील या भागात बोटीच्या सहाय्याने अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत होता. तहसिलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्यात सतत कारवाई होत असल्याने सध्या वाळू माफियांचे धास्ताववले आहेत. सदर महसूल पथकात मंडल अधिकारी एम. एल. स्वामी, रा. ना. वाघमारे, तलाठी महेश राठोड, तलाठी कुंभार, पोलिस पाटील, कोतवाल राजू पाटील, विठ्ठल गुरव, अनिल जमादार आदी उपस्थित होते.

Web Title: Hidden Boat burned One hundred brass seized illegal sand