उच्चस्तरीय चौकशी समिती नेमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सांगली - म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणी शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून कारवाई करावी. जिल्ह्यात वाढलेल्या महिला अत्याचार प्रकरणी पोलिस यंत्रणेची चौकशी करावी, अशी मागणी जनवादी महिला संघटनेने आज केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जनवादी महिला संघटनेच्या वतीने म्हैसाळमधील भ्रूणहत्या प्रकरणी निदर्शने करण्यात आली. म्हैसाळमधील प्रकरण गंभीर आहे. त्याची चौकशी स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत करावी. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली. 

पोलिस यंत्रणेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. रेशनिंग व्यवस्था बळकट करून महागाईवर नियंत्रण आणावे. 

शासनाने गॅस दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा जाधव, सचिव रेहाना शेख, खजिनदार बेबीजोहरा नदाफ, दिलशान टिनमेकर, आशा माळी, नंदाताई जगताप यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Web Title: high-level inquiry committee