महामार्ग बनले मृत्यूचे सापळे 

महामार्ग बनले मृत्यूचे सापळे 

सोलापूर - राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीत तब्बल 35 हजार 853 अपघात झाले आहेत. त्यामध्ये 11 हजार 837 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे. विकासाच्या दृष्टीने तयार केलेले महामार्गच मृत्यूचे सापळे बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गांवरील खड्डे, ब्लॅक स्पॉटकडे संबंधित यंत्रणेचा काणाडोळा आणि वाहनचालकांची बेशिस्त अशी अपघाताची कारणे आहेत. 

सोलापूर-पुणे, पुणे-मुंबई, नाशिक, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर या महामार्गांवर मागील वर्षात मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. त्यासाठी महामार्गांवरील नादुरुस्त दुभाजक, रस्त्यावर थांबलेली अथवा बंद पडलेली वाहने, सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण आदींसह अन्य कारणे जबाबदार आहेत. दरम्यान, अपघात रोखण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) दुरुस्त करून पर्यायी उपायोजना करणे, बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालणे अपेक्षित आहे. तरीही महामार्गांवरील सुमारे 80 टक्‍के दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसतानाही आरटीओ व पोलिसांकडून कारवाई मात्र शहराअंतर्गत केली जात आहे. 

तीन वर्षांतील आकडेवारी 
मागील तीन वर्षांतील 1.09 लाख अपघातात 37 हजार जणांचा मृत्यू 
2016च्या तुलनेत 582, तर 2017च्या तुलनेत गतवर्षी 37 "ब्लॅक स्पॉट' वाढले 
तीन वर्षांत वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून 495 कोटी रुपयांचा दंड वसूल 
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे एकमेकांकडे बोट 
2016 ते 2018 दरम्यान 2.79 कोटी वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणे काही जण फॅशन समजतात. राज्यातील एकूण अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर दुचाकीस्वारांना स्वयंशिस्त लागावी म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यात हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मागील 15 दिवसांत सुमारे अडीच हजार जणांवर कारवाई करून साडेदहा लाखांचा दंड वसूल केला आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com