VidhanSabha 2019 : 'ही" हिंदूवादी संघटनाही लढण्यास इच्छुक

VidhanSabha 2019 : 'ही" हिंदूवादी संघटनाही लढण्यास इच्छुक

कोल्हापूर - ‘‘सध्याची राजकीय परिस्थिती गंभीर असून, विरोधी पक्ष हा अस्तित्वहिन झाला आहे. सध्याची पक्षांतरे पाहता या नेत्यांकडे कोणताही मूलभूत विचार नसल्याने ही नेते मंडळी सहजपणे पक्षांतरे करत आहेत, हिंदू महासभा विधानसभा लढविणार आहे, असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांनी दिले. 

स्वातंत्र्य सावरकरांनी ७० वर्षापूर्वी म्हटले होते की, जनसंघाची एकतर काँग्रेस होईल किंवा हिंदू महासभा होईल. याच जनसंघापासून भाजप निर्माण झाला. काँग्रेस मुक्त करण्यास निघालेली भाजप आज काँग्रेसमय झाली आहे. हिंदू महासभेचा काँग्रेसला स्वातंत्र्यापूर्वीपासून विरोध राहिलेला आहे. काँग्रेस आणि भाजपच्या विचारसरणीत काहीच भेद उरलेला नाही. आज हिंदुत्व प्रखर करण्याची आवश्‍यकता आहे. राज्यात हिंदू महासभा एक विकल्प किंवा पर्याय म्हणून मतदारांनी पाहण्याची आवश्‍यकता आहे.’’

ॲड. संगीता तांबे यांनी हिंदू महासभेमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली. हिंदू महासभेच्या नूतन जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन जागृतीनगर, तीनबत्ती चौक येथे झाले. उपाध्यक्ष गोविंद गांधी, राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश भोगले, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह विलासराव खानविलकर, जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, संजय कुलकर्णी, राजेश मेथे, राजेंद्र शिंदे, सचिन पाटील, प्रमोद घोरपडे, मारुती मिरजकर, सुवर्णा पोवार, रेखा दुधाणे, कुमार काटकर, उत्तम कांबळे, विनोद कोरे, संग्रामसिंह गायकवाड, आनंद कुलकर्णी, मारुती वगेरे, संतोष पवार, जयवंत निर्मळ, मनिषा पवार, विजय बोंद्रे, शालनताई शेटे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com