आंबेडकर जयंतीनिमित्त ऐतिहासिक स्थळांचा विकास

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 25 मार्च 2017

राज्यातील 28 ठिकाणांसाठी 30 कोटींची तरतूद
सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त राज्यातील 28 स्थळांचा विकास सरकारमार्फत केला जाणार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या स्थळांचा त्यात समावेश आहे.

डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदान, तसेच आधुनिक भारत घडविण्यामध्ये त्यांचा असलेला मोलाचा सहभाग पाहता त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांनी केलेल्या संघर्षापासून समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी "समता व सामाजिक न्याय वर्ष' साजरे केले जात आहे. त्याअंतर्गत बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित असलेल्या स्थळांचा विकास करणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा विकास करण्याचे नियोजन आहे.

प्रस्तावित स्थळांचा विकास करण्यासाठी समाजकल्याण आयुक्तांमार्फत सरकारकडे प्रस्ताव पाठविले जाणार आहेत. निवड झालेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी मान्यता स्वतंत्रपणे दिली जाणार आहे. "समता व सामाजिक न्याय वर्ष' योजनेंतर्गत स्थळांच्या विकासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या स्थळांचा विकास करून आगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

Web Title: historical place development ambedkar birth anniversary