हिवरे तिहेरी खून सुनावणी : दहा वर्षीय साक्षीदाराने ओळखले हल्लेखोर 

हिवरे तिहेरी खून सुनावणी : दहा वर्षीय साक्षीदाराने ओळखले हल्लेखोर 

सांगली - हिवरे येथील तीन महिलांच्या खून खटल्यातील महत्वाच्या दोघांची साक्ष आज झाली. त्यातील दहा वर्षीय सूरज पाटील याच्या साक्षी दरम्यान, त्याने थेट हल्लेखोर ओळखले. दोघांचीही सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. जिल्हा न्यायाधीश दत्तात्रय सातवळेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. 

खानापूर तालुक्‍यातील हिवरे येथे तीन वर्षांपूर्वी तीन महिलांची हत्या करण्यात आली. या खटल्याची सुनावणी 11 सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयात सुरू झाली असून विशेष सरकारी वकील निकम हे सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. आजच्या सुनावणीत शोभाताई पाटील यांचा सरतपास अॅड. निकम यांनी घेतला. त्यानंतर पहिल्या दिवशी घटनास्थळाची माहिती व न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्र हा धागा पकडून बचाव पक्षाचे वकील सुतार यांनी साक्षीदार शोभाताई पाटील यांचा उलटतपास केला. यात जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर दहा वर्षीय सूरज पाटील याचा सरतपास घेण्यात आला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता.

खानापूर तालुक्‍यातील हिवरे हे त्याचे आजोळ आहे. घटना घडली त्याआधी दोन दिवस दोन आजी-आजोबांना भेटण्यासाठी आईसोबत गेला. तेव्हापासूनचा घटनाक्रम त्याने त्याने न्यायालयासमोर सांगितला. तिघांचा खून करणाऱ्या हल्लेखोरांनाही त्याने न्यायालयामोर ओळखले. यापूर्वी ओळख परेडवेळीही त्याने नऊ जणातून या दोघांना ओळखले होते.

विशेष बाब न्यायालयाने नोंदवून घेतली. त्यानंतर अॅड. सुतार यांनी उलटतपास घेतला. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेले सुधीर सदाशिव घोरपडे व रवींद्र रामचंद्र कदम हे दोघे न्यायालयासमोर हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com