हिवरेबाजार येथेही पर्यटकांना गावबंदी 

Hivarebazar also banned tourists
Hivarebazar also banned tourists

नगर ः जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हिवरेबाजारमध्ये ग्रामविकासाची संकल्पना अनुभवण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना तूर्तास बंदी घालण्याचा निर्णय हिवरेबाजार ग्रामस्थांनी घेतला आहे.

पर्यटकांनी प्रेमाचा व खबरदारीचा एक भाग म्हणून त्याचा स्वीकार करावा, कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये, कोरोना विषाणूच्या साथीला धैर्याने तोंड देऊन साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले आहे. 
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने एकापासून दुसरीकडे जाण्याचा धोका जास्त असतो. खबरदारीची उपाययोजना म्हणून कोरोना जोपर्यंत आटोक्‍यात येत नाही, तोपर्यंत पर्यटकांनी हिवरेबाजार येथे भेट देण्याचे तूर्तास टाळावे, त्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. बंदीचा हा भाग काही काळासाठी राहील, असाही निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही गावकर्यांसोबत चर्चा करून राळेगणसिद्धी येथे पर्यटकांना गावबंदी केली आहे. आतापर्यंत तेथे तब्बल १६ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या वरील दोन्ही गावांमध्ये पर्यटकांचा गावच्या यंत्रणेवर ताण येतो, असे तेथील दोन्ही गावांतील प्रमुखांचे म्हणणे आहे. गावकर्यांचाही या निर्णयाला पाठिंबा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com