हिवरेबाजारच देशातील मार्गदर्शक प्रशिक्षण केंद्र : अमिर खान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नगर : "पाणी आडवा, पाणी जिरवा' मोहीमेसाठी हिवरेबाजारच देशातील मार्गदर्शक प्रशिक्षण केंद्र आहे. पाणी फाउंडेशनच्या स्थापनेस याच गावाची संकल्पना असून, आगामी काळात देशातील चार हजार गावे पाणीदार बनविणार असल्याचे विचार प्रसिद्ध सिने अभिनेते अमिर खान यांनी व्यक्त केले. 

हिवरेबाजार (ता. नगर) येथील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी अभिनेते अमिर खान आज पत्नीसह आले होते. राज्याच्या आदर्शगाव संपल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर खान यांनी पत्नीसह गावातील जलसंधारणाच्या कामांची सखोल माहिती घेऊन ग्रामस्थांनी संवाद केला. हिवरे बाजारमध्ये पाणलोटासाठी झालेल्या कामांचीच प्रेरणा व प्रोत्साहन पाणी फाउंडेशनला मिळाले. त्यातूनच हा उपक्रम हाती घेतला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: hiwarebajar village is training centre said by aamir khan