#SataraFlood शाळा-महाविद्यालयांना गुरुवारीही सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सुट्टीचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आदेश. 

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी उद्या (गुरुवार, ता. 8) शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड व पाटण या तालुक्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्टी राहील. दरम्यान फलटण, माण, खटाव व काेरेगाव, खंडाळा तालुक्यातील शाळा व महाविद्यालय नियमीत सुरु राहतील याची नाेंद शाळा, महाविद्यालय, पालकांनी घ्यावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hoilday for school & college in satara district