वाहतूक नियमनासाठी होमगार्ड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे 75 होमगार्ड; 12 पॉइंटवर ड्यूटी
सातारा - पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने इतर पर्यायी रस्त्यांवर प्रचंड वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यातच वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्यावर ताण येतो आहे. त्यातून पर्याय काढण्यासाठी आता शहरात वाहतूक नियमनासाठी होमगार्ड तैनात केले आहेत. शहरासह जिल्ह्यात १०० होमगार्ड वाहतूक नियमन करत आहेत.

ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्यामुळे शहरातील पर्यायी अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण, अडथळे काढण्यासाठी ‘सकाळ’ने प्रखरपणे भूमिका मांडली.

त्यानंतर नगरपालिका, पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढली. शिवाय, वाहतूक सुकर होण्यासाठी ‘सकाळ’ने संबंधितांची बैठकही बोलावली होती. त्यामध्ये पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ अपुरे असल्याचे पुढे आले आणि होमगार्ड अथवा स्वयंसेवक वाहतूक नियमन करण्यासाठी घेण्याची संकल्पना मांडली गेली. त्यानुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी कार्यवाही करत होमगार्ड विभागापुढे ही संकल्पना मांडली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी १०० होमगार्ड रुजू करण्यात आले आहेत. सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी ७५ होमगार्ड कार्यरत असून, शहरातील १२ ठिकाणांवर होमगार्ड तैनात केले आहेत. दरम्यान, यामध्ये महिला होमगार्ड नसल्याने महिलांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. 

होमगार्ड संख्या
शहर वाहतूक शाखा - 50
शाहूपुरी वाहतूक शाखा - 25 
महाबळेश्‍वर पोलिस - 13
पाचगणी पोलिस - 12

...हे फायदे
     वाहतूक नियमन सुकर झाले
     पोलिसांना मनुष्यबळ लाभले
     होमगार्डना रोजगार उपलब्ध
     सर्व ठिकाणांवर पोलिस हजर

Web Title: Home guards for traffic rules