भाडे थकल्याने घरमालकाने ठाेकले बीएसएनएल कार्यालयास टाळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

बांबवडे - येथे तेरा महिन्यांपासून भाडे थकल्याने बीएसएनएलच्या कार्यालयास घर मालकाने टाळे ठोकल्याचा प्रकार घडला आहे. ऐन पावसाळ्यात सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची कुचंबना होत आहे. बीएसएनएलच्या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या बँका व व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे. 

बांबवडे - येथे तेरा महिन्यांपासून भाडे थकल्याने बीएसएनएलच्या कार्यालयास घर मालकाने टाळे ठोकल्याचा प्रकार घडला आहे. ऐन पावसाळ्यात सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची कुचंबना होत आहे. बीएसएनएलच्या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या बँका व व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे. 

याबाबत माहिती अशी की, बांबवडे येथील बीएसएनएलचे कार्यालय हे भाडे तत्त्वावर आहे. गेल्या तेरा महिन्यांपासून भाडे थकल्याने घर मालकाने संबंधी अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. परंतू थकीत भाड्याबाबत कोणीही बोलण्यास तयार झाले नाही. घरमालकाने लेखी सुचना देऊनही यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे एक जुलैपासून घरमालकाने कार्यालयास टाळे ठोकले. ऐन पावसाळ्यात बहुतेक दूरध्वनी बंद पडले आहेत. इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. परंतु कार्यालय बंद असल्याने कर्मचारी काहीच करु शकत नाहीत.

दररोज कर्मचारी कार्यालयाच्या दारात बसून माघारी जातात. बांबवडे दुरसंचारचे अधिकारी जमीर गवंडी यांना संपर्क केला असता ते फोन घेत नाहीत त्यामूळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

"दुरसंचारकडुन भाडे न भरणे ही दुर्दैवी घटना आहे. जर ही सेवा सुरळीतपणे सुरु झाली नाही तर ग्राहकांच्या हिताचा व हक्कांचा विचार करुन कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. ग्राहकांचे नुकसान झाल्यास कायद्याचा आधार घेऊन त्याबाबतच्या नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रयत्न करेल."

- जगन्नाथ जोशी, 

जिल्हा संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeowner lock BSNL office in Bambavade Kolhapur

टॅग्स