आमदार गणपतराव देशमुख यांना ताम्रपट प्रदान सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सांगली : शेतकरी कामगार पक्षाचे लढावू नेते व ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचा येत्या रविवारी (ता.2) कवठे एकंद (ता.तासगाव) येथे ताम्रपट देऊन नागरी सत्कार होणार आहे. क्रांतीवीर हौसाक्का पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ होईल.

क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात दुपारी एक वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा.बाबुराव गुरव यांनी ही माहिती दिली.

गुरव म्हणाले, "आमदार देशमुख यांनी आयुष्यभर कष्टकरी वंचित वर्गासाठी लढे दिले. दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासह पाणी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढले. या प्रयत्नांचाच भाग म्हणून आज सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी भागापर्यंत पोहचले आहे. अजूनही समन्यायी पाणी वाटपाचा लढा सुरुच आहे. शासन दरबारी आज आमदार देशमुख या सर्व चळवळींचे हक्काचे प्रतिनिधी म्हणून ठामपणे लढत आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून हा सोहळा होत आहे.''

कार्यक्रमासाठी माजी आमदार संपतराव पाटील, माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड, वैभव नायकवडी यांची प्रमुख उपस्थितीत आहे. सत्कार समितीमध्ये गोविंद गुरव, राजश्री पावसे, डॉ नरेंद्र खाडे, शंकरराव माळी, प्रा.बाबुराव लगारे यांचा समावेश आहे. 

Web Title: Honor of senior leader Ganpatrao Deshmukh