हॉर्नच्या कर्कश्‍य आवाजाने नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

भुईंज - भुईंज, पाचवड बाजारपेठ तसेच इतर गावांच्या ठिकाणी शाळांच्या रस्त्यावर कर्णकर्कश्‍य हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणाबरोबर अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असून, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या मानसिक स्थितीवरही त्याचा परिणाम होत आहे. बेदरकार दुचाकी चालविणाऱ्या ‘स्टंटबाजां’मुळे त्यात आणखी भर पडत असल्याने हुल्लडबाज तरुणाईला आवर घालणार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. 

जुने वर्ष संपून नवीन शैक्षणिक सुरू झाले आहे. शाळा, महाविद्यालयांचा परिसर विद्यार्थ्यांनी भरून गेला आहे. प्रवेश निश्‍चिती झाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठा व शालेय रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. अशा स्थितीमध्ये रस्त्यांवरून एकाग्रपणे वाहन चालविताना अचानक प्रेशर हॉर्न वाजवण्यामुळे बिचकल्यासारखे होते. 

सुसाट तरुणाईकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज
तरुणाईच्या बेफिकीर वृत्तीकडे पालकांनीही लक्ष देणे आवश्‍यक आहे. दुचाकीला हॉर्न कसा आहे, तो कसा दुचाकी चालवितो. दुचाकी चालविण्यातील धांदरटपणा मुलांच्या जिवावर बेतत असल्याचे अनेक अपघातांतून समोर आले आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक युवकांना जीव गमवावे लागले आहेत. अशी ताजी उदाहरणे सध्या भुईंज व पाचवडमध्ये आढळून येत आहेत. ती वेळ कोणावरही येऊ नये यासाठी घरातून मुलांच्या वाहन चालविण्याच्या पध्दतीवर नियंत्रण आवश्‍यक आहे.

Web Title: Horn shrieking voice of citizens suffer