गाभण घोडीला मालकानेच मारहाण करून बुडवून मारले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सांगली : 'माणसाच्या क्रौर्याला काहीही मर्यादा नसते' हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवणारी घटना सांगलीत घडली. पाळीव प्राण्यांवर मालकांचा जीव असतो असं म्हणतात; पण सांगलीतील एका व्यक्तीने त्याच्या घोडीला अमानुष मारहाण करत नदीत बुडवून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, ती घोडी गाभण होती..

कृष्णा नदीत घोडीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. 'मालकानेच मारहाण करून घोडीला ठार मारले' अशी फिर्याद त्यांनी पोलिसांमध्ये दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  :शहरातील शामरावनगर भागातील श्रीराम बळवंत नरुटे याने स्वतःच्या मालकीच्या गाभण घोडीला मारहाण करीत ओढत माई घाटावर नेले. दमलेल्या घोडीला पाण्यात खेचून तिचा श्‍वास गुदमरेपर्यंत बुडवले. त्यातच घोडीचा मृत्यू झाला.

या प्रकारानंतर परिसरातील काही सजग नागरिकांनी ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया आणि प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांना कळवले. पोळ आणि सहकारी प्रसाद सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून पंचनामा केला. 

घोडी मालकाला कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार आहोत. गुन्हा दाखल होताना काही राजकीय मंडळींनी पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
- कौस्तुभ पोळ, प्राणीमित्र

Web Title: In a horrific incident, owner killed his pregnant mare in Sangli