नियम कागदावर राहिल्याने घोडेसवारीस धोका

वेण्णालेक - चित्तथरारक परंतु धोकादायक घोडेसवारी.
वेण्णालेक - चित्तथरारक परंतु धोकादायक घोडेसवारी.

भिलार - पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळांवर घोडेसवारी करताना होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या साहसी पर्यटकांची सुरक्षाच रामभरोसे ठरत आहे. गेल्या वर्षी पाचगणीत आणि आता महाबळेश्वर येथे पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागल्याने या अपघातातून घोडे चालक, प्रशासन यांना बोध घेण्याची वेळ आली असून, नियम व अटी केवळ कागदावरच राहिल्यामुळे अशा घटना घडत आहेत. घोडा व्यवसाय टिकवून हे अपघात रोखण्याचे आव्हान दोन्ही पालिकांपुढे निर्माण झाले आहे. 

ऑक्‍टोबर २०१८ मध्ये मुंबईतील शिवडीमध्ये राहणारे नवदांपत्य हनिमून साजरा करण्यासाठी पाचगणीला आले असताना टेबल लॅंडवर घोड्यावरून फेरफटका मारताना त्यातील महंमद नसीब करम खान (वय ३५) यांचा घोडा अचानक उधळला आणि त्यात घोड्यावरून खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यावेळी घोडेसवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनेला आता सहा महिने उलटले नाहीत, तोच आता महाबळेश्वर येथे वेण्णालेकवर मंगळवारी सायंकाळी घोडेसवारी करणारे जळगाव येथील दिलीप मोतीलाल दहाडे (वय ६२) हे वृध्द पर्यटक घोड्यावरून पडून गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनांनी पर्यटनस्थळांवरील घोडेसवारी सुरक्षित होणे गरजेचे वाटत आहे. 

पाचगणी येथे घोड्यावरून पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर घोडे व्यवसाय बंद ठेवण्यात आलेला होता. घोड्यावरून पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी हेल्मेट, नीपॅडसह अत्यावश्‍यक गोष्टी, घोडे व व्यावसायिकांची नोंदणी, रितसर परवाना देण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. त्याचपद्धतीने झालेल्या बैठकीत पालिका प्रशासन, घोडे व्यावसायिक आदींना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य 
ती खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या होत्या. 

घोड्यांची रीतसर नोंदणी करण्यात आली. व्यावसायिकांना ओळखपत्र, परवाना देण्यात येणार, असे सांगण्यात आले. हेल्मेटशिवाय पर्यटकांना घोड्यावर बसवू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या. परंतु, हा नुसताच ‘फार्स’ ठरला. नियम कागदावरच राहिले आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्याची... परिस्थिती निर्माण झाली. त्यातच कालचा अपघात झाला. त्यामुळे घोडे अपघाताचा आणि पर्यटक सुरक्षिततेच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. 

बहुतेक वेळा पर्यटक हे घोडेसवारी करतानाच घोडेवाल्यांना सोबत घेण्यास टाळाटाळ करून स्वतःच घोडां संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन केल्यावर पर्यटकांना सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने हेल्मेट परिधान केल्यास निदान अनावधानाने अपघात झालाच तर त्यांचे प्राण वाचू शकतात.

यासाठी व्यवसायिकांनीही ठरवून दिलेल्या नियमानुसार पर्यटकाने हेल्मेट घातल्याशिवाय घोडेसवारी करू देणेच अयोग्य आहे. ही खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. घोडे व्यावसायिक मात्र कोणतेही नियम पाळत नसल्याची बाब महाबळेश्वमधील घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, पालिका प्रशासन याबाबत आता काय भूमिका घेणार, हा प्रश्न आहे. अशा अपघातांना आळा बसावा म्हणून महाबळेश्वर पोलिस प्रशासनाने पालिकेला सूचना देवून परवाना पध्दत लागू केली आहे. परवाना देताना घोडे व्यावसायिकांनी काही नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे नियम पाळत नाहीत, अशांना पालिका परवाना देत नाही अथवा दिलेला परवाना रद्द करते. घोडेसवारी करणाऱ्यांना घोड्यावर बसताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अद्याप या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. रपेट मारताना त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घोडे व्यावसायिक घेत नाहीत. त्यांना साधे हेल्मेटही घालण्यास देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

संवेदनाहीन महाबळेश्वरकर...
ज्या ठिकाणी घोडे व्यवसाय सुरू असतो, तेथे मोठ्या प्रमाणावर पालिका कर्मचारी असतात. परंतु, अपघात घडला तेव्हा कोणीही या घोडे व्यावसायिकाकडे लक्ष दिले नाही. येथील स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार मिळाले असते तर कदाचित दिलीप दहाडे यांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. इतके सवेदनाहीन महाबळेश्वरकर झाले आहेत काय? असा प्रश्न पर्यटकांकडून विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com