पुण्यात 14 ऑगस्टला मराठा मुलींसाठी वसतीगृह - चंद्रकांत पाटील

संतोष भिसे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मिरज - मराठा मुलींसाठी पुण्यातील पहिले वसतीगृह 14 ऑगस्ट रोजी सुरु होईल; त्यानंतर पंधरवड्यात मुलांसाठीही सुरु केले जाईल, अशी माहीती महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

मिरज - मराठा मुलींसाठी पुण्यातील पहिले वसतीगृह 14 ऑगस्ट रोजी सुरु होईल; त्यानंतर पंधरवड्यात मुलांसाठीही सुरु केले जाईल, अशी माहीती महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने तुर्त कोणतीही ठोस कृती करता येणार नाही; तरीही सरकार आपल्या परीने विविध योजना राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्यातील वसतीगृहे सुरु होत आहेत. कोल्हापुरात तीन ऑगस्टला वसतीगृह सुरु झाले आहे. सांगलीतही आठवडाभरात मुलांसाठी वसतीगृह सुरु होईल. तेथे 90 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होईल. अधिक्षकासह विविध कर्मचारी नेमण्याची प्रक्रियाही पार पाडावी लागेल. मिरजेत लोकमान्य कॉलनीत आज त्यांनी एका इमारतीची वसतीगृहासाठी पाहणी केली

Web Title: Hostel for Maratha Girls Chandrakant Patil Comment

टॅग्स