नववर्षाचा जल्लोष पहाटे पाचपर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सांगली : नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष पहाटे पाचपर्यंत चालू ठेवता येणार आहे. राज्य शासनाने त्यासाठी विशेष परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटेल, बार, ढाबे पहाटेपर्यंत सुरु राहणार आहेत. खासगीत पार्टी करणाऱ्यांना त्याचा स्वतंत्र परवाना घ्यावा लागणार आहे. त्यासाठी पाच हजार ते दहा हजार लोकसमुहापर्यंत मान्यतेसाठी वेगवेगळे दर आकारले जाणार आहेत. 

दरम्यान, या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा दक्ष ठेवण्यात आली आहे. पोलिस दलाकडून जिल्ह्यातील मुख्य शहरांत चौकाचौकात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बार मालकांना काही सक्त सूचना करण्यात येणार आहेत. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना पहाटेपर्यंत तेथेच थांबवून घेण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाऊ शकते. त्यामुळे "मला कोण काय करतोय', या अविर्भावात मद्यमान करून वाहन चालवल्यास सारी रात्र थंडीत कुडकुडत काढायला लागू शकते. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारु विकली जाऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचे अधीक्षक किर्ती शेडगे यांनी सांगितले. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून छापेमारी सुरु आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील तीन ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. त्यात म्हैसाळ, नागज आणि पेठनाका येथे कसून तपासणी केली जाणार आहे. नागज, म्हैसाळ हा बनावट दारु जिल्ह्यात येऊ नये, यासाठीचा नाका असणार आहे.

पाच रुपयांचा घ्या परवाना 
मद्यपान करायचे असेल तर 31 डिसेंबरसाठी एक दिवसाचा परवाना घ्यावा लागेल. त्याचे मूल्य अवघे पाच रुपये आहे. हा परवाना सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातून सांगण्यात आले. 

Web Title: Hotels pubs are opened till 5 am in Maharashtra