बापरे! नागणसूरमध्ये घर फोडून 'ऐवढा' ऐवज चोरला 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

चोरट्याने बंद केलेल्या घराच्या गच्चीचा दरवाजा अज्ञात हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. घरातील बंद खोलीचे कुलूप तोडून घरातील 17 तोळ्याचे दागिने व रोख रुपये 58 हजार 500 असा सुमारे चार लाख 94 हजार 500 रुपयांचा ऐवज व रक्कम चोरून नेली.

अक्कलकोट (सोलापूर) : परगावी गेल्यामुळे बंद असलेल्या घराच्या गच्चीचा दरवाजा चोरट्याने हत्याराने उचकटून घरात प्रवेश करून घरातील बंद खोलीचे कुलूप तोडून सुमारे 17 तोळे सोने व रोख 58 हजार 500 असा सुमारे चार लाख 94 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला. ही चोरी तालुक्‍यातील नागणसूर येथे आज पहाटे उघडकीस आली. याची दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. 

हेही वाचा : 'त्यांच्या कष्टाला पुरस्काराचे फळ'
या चोरीची फिर्याद शशिधर गड्डप्पा हत्तुरे (वय 56, रा. नागणसूर) यांनी दिली. शशिधर हे पत्नीसह नागणसूर येथे राहतात. त्यांचा एक मुलगा सोलापूर येथे राहतो. नातेवाइकांच्या लग्नासाठी म्हणून शनिवारी दुपारी एक वाजता शशिधर सोलापूर येथील मुलाकडे राहण्यासाठी गेले होते. जाताना घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावून गेले होते. चोरट्याने बंद केलेल्या घराच्या गच्चीचा दरवाजा अज्ञात हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. घरातील बंद खोलीचे कुलूप तोडून घरातील 17 तोळ्याचे दागिने व रोख रुपये 58 हजार 500 असा सुमारे चार लाख 94 हजार 500 रुपयांचा ऐवज व रक्कम चोरून नेली. 

हेही वाचा : ... अन् दीड वर्षाचा जयदीप आला चाकाखाली!
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये बिलवर, पाटली, गंठण, नेकलेस, कानातील फुलांची साखळी व सोन्याच्या अंगठ्या आदींचा समावेश आहे. ही घटना शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान घडली. पोलिस खात्याने चोरीच्या ठिकाणी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. चोरट्यांवर दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. राठोड करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A house was stolen in Nagannasur