चोऱ्यांचा सिलसिला थांबणार कधी...? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

सांगली - बंद घरे आणि बंगले फोडण्याचा सिलसिला सुरूच आहे. पोलिसांची रात्रीची गस्तही सुरूच आहे. तरीही दिवसा बंद घरे, बंगले हेरून ती फोडली जातात. चोरीचे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षितता बाळगणे हाच योग्य पर्याय ठरत आहे. अलार्म सिस्टीम, सीसीटीव्ही, मजबूत कडी-कोयंडे आणि शेजारी दक्ष असतील चोऱ्या टाळता येतील. 

सांगली - बंद घरे आणि बंगले फोडण्याचा सिलसिला सुरूच आहे. पोलिसांची रात्रीची गस्तही सुरूच आहे. तरीही दिवसा बंद घरे, बंगले हेरून ती फोडली जातात. चोरीचे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षितता बाळगणे हाच योग्य पर्याय ठरत आहे. अलार्म सिस्टीम, सीसीटीव्ही, मजबूत कडी-कोयंडे आणि शेजारी दक्ष असतील चोऱ्या टाळता येतील. 

सुटी, कामानिमित्त परगावी जाताना अनेकजण कपाटात दागिने ठेवून जातात. शेजाऱ्यांना कळवत नाही. चोरटे दिवसा टेहळणी करून रात्री कडी-कोयंडा तोडून सहजपणे दागिने लंपास करतात. पोलिसांनी अनेकदा पत्रके वाटूनही आवाहन केले, की परगावी जाताना पोलिस ठाण्यात कळवत जा. परंतु नागरिक दक्षता घेत नाहीत. चोरीचे प्रकार वाढतात. 

बंगला, घरी चोरट्यांचा प्रवेश सहज होत असल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढलेय. हा आजवरचा अनुभव आहे. लाखो, कोटींच्या बंगल्यांला, फ्लॅट, घरांना शोभेचा कडी-कोयंडा बसवला जातो. हातोड्याच्या एका घावात कडी-कोयंडा तुटतो. शोभेच्या कडी-कोयंड्याऐवजी दोनशेंचा लोखंडी कडी-कोयंडा चोरट्यांना काही काळ तरी अडवून ठेवतो. परंतु दुर्लक्ष केले जाते. 
बंगला लाखोंचा पण हजारातील अलार्म सिस्टीम मात्र बसवली जात नाही. दरवाजा शेजारीच अशी सिस्टीम बसवली जाऊ शकते. फक्त मानवी हालचालीनंतर मोठ्याने सायरन वाजवणारी यंत्रणा दहा-पंधरा हजारांत बसवली जाऊ शकते. लाखमोलाचा ऐवज चोरीपासून वाचू शकतो. त्याकडेही दुर्लक्ष होते. अपार्टमेंट, मोठ्या बंगलो सिस्टीममध्ये बऱ्याचदा सुरक्षा रक्षक नसतो. सीसीटीव्ही बसवण्याकडेही दुर्लक्ष होते. चोरट्यांना अशा ठिकाणी चोरी करणे सोपे जाते. 

घर, बंगले, अपार्टमेंट बांधताना सुरक्षेचा विचारच केला जात नाही. संरक्षक भिंत नसणे, रक्षक नसणे, अलार्म सिस्टीम, सीसीटीव्हीसारख्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्यास चोरीसारख्या दुर्घटना निश्‍चित रोखता येतील. 

याकडे हवे लक्ष 
* घराच्या दरवाजांना लोखंडी व मजबूत कडी-कोयंडे. लॅच की चा पर्याय. 
* परगावी जाताना दागिने बॅंकेतील लॉकर्समध्येच 
* पोलिस ठाण्यात कल्पना देऊन परगावी गेल्यास ते रात्री गस्त. शेजाऱ्यांना कळवल्यास तेदेखील लक्ष ठेवतील. 
* घरी, बंगल्यात अलार्म सिस्टीम, सीसीटीव्ही यंत्रणा बसवा. 
* अपार्टमेंट, कॉलनीत सुरक्षा रक्षक तैनात ठेवावा. 

Web Title: Off houses and bungalows start of battering