सगळीकडे अराजकता, तरी त्यांचा विजय कसा? 

सगळीकडे अराजकता, तरी त्यांचा विजय कसा? 

नगर - "देशात, राज्यात विरोधी वातावरण आहे. सरकारवर कोणाचा विश्‍वास नसल्याने वेगवेगळ्या कारणांनी लोक रस्त्यावर उतरत आहेत. सगळीकडे अराजकता असताना सरकारचे लोक निवडून येतातच कसे,'' असा प्रश्‍न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी उपस्थित केला आहे. "सरकारचा प्रत्येक बाबीत हस्तक्षेप होत असल्याने लोकशाही धोक्‍यात आली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे लोक मोठ्या पदावर बसविले जातात,' असा आरोपही त्यांनी केला. 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे "संविधान बचाव, देश बचाव' अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्त फौजिया खान आज येथे आल्या होत्या. माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा कदम, माजी आमदार उषा दराडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजूषा गुंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, मेधा कांबळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, प्रा. माणिक विधाते, संजय कोळगे, ऍड. शारदा लगड, निर्मला मालपाणी, ज्योती काकडे, सोनाली देशमुख आदी या वेळी उपस्थित होत्या. 

फौजिया खान म्हणाल्या, ""सरकारने निवडणूक आयोग, आरबीआय, मीडिया ताबा घेतला आहे. न्यायव्यवस्थेतील लोकही आता समोर येऊन व्यथा मांडत आहेत. वरिष्ठ अधिकारी पदावर "आरएसएस' विचारसरणीचे लोक भरण्याची योजना आखली आहे. अगदी राज्यपालही "आरएसएस'चे आहेत की नाही, हे पाहिले जाते. हे देशासाठी घातक असून, लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरू आहे. सरकार गुंडशाहीला पाठबळ देत आहे. लोकांची हत्या करणाऱ्यांचा सत्कार केला जात आहे.'' 

"ईव्हीएम, मनूस्मृतीची होळी 
खान म्हणाल्या, "भाजप सरकारवर लोकांचा अजिबात विश्‍वास राहिला नाही; मात्र तरी त्यांचे लोक निवडून येतात. जळगाव, सांगली महापालिका निवडणुकीत पैशांचा सर्रास वापर झाल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. "ईव्हीएम'वरही आमचा विश्‍वास नाही. देशातील 17 पक्षांनी "ईव्हीएम' ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची विचारसरणी पेरत आहे. त्यामुळे आम्ही "संविधान बचाव, देश बचाव' अभियानात "ईव्हीएम' व मनुस्मृतीची होळी करीत आहोत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com