किती बेड शिल्लक... कोरोना ग्रस्तांसाठी सांगली-मिरजेतील महत्वाची माहिती 

अजित झळके
Monday, 10 August 2020

कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना सांगली, मिरज शहरात आता अत्यंत कमी बेड शिल्लक राहिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 10 ऑगस्टला दुपारी साडेपाच वाजेपर्यंत आयसीयूचे 39 तर जनरल वॉर्डमधील 240 बेड शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

सांगली ः कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना सांगली, मिरज शहरात आता अत्यंत कमी बेड शिल्लक राहिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 10 ऑगस्टला दुपारी साडेपाच वाजेपर्यंत आयसीयूचे 39 तर जनरल वॉर्डमधील 240 बेड शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात, ही माहिती कधी व किती वाजता अपडेट केली आहे, याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही. 

या माहितीनुसार, वॉन्लेस इस्पितळात आयसीयूमध्ये 20 रुग्ण दाखल करून 2 बेड शिल्लक आहे. संशयितांसाठीच्या विभागात 11 रुग्ण दाखल असून एक बेड शिल्लक आहे. येथे जनरल वॉर्डमध्ये 16 बाधित दाखल असून 26 बेड शिल्लक आहेत. संशयितांसाठी 24 बेड शिल्लक आहेत. 

इतरांचा चार्ट असा ः भरलेले बेड / रिकाम्या जागा या क्रमाने 

* रुग्णालय * आयसीयू पाझिटिव्ह * आयसीयू संशयित *जनरल वॉर्ड पॉझिटिव्ह * जनरल वॉडॅ संशयित 
* भारती हॉस्पिटल *22/2 * 9/6 * 56/24 *22/9 
* घाडगे हॉस्पिटल * 7/12 * 5/1 * 16/23 * 5/1 
* मेहता हॉस्पिटल * 10/6 * 3/0 * 5/25 * 3/0 
* सिव्हिल, सांगली * 12/0 * 10/0 * 0/16 * 0/8 
* वॉन्लेस (खासगी कोटा) * 10/0 * 0/0 * 28/12 * 0/0 
* कुल्लोळी हॉस्पिटल * 11/1 * 4/3 * 9/9 * 6/0 
* मिरज चेस्ट सेंटर * 7/3 * 9/1 *20/10 *0/0 
* मिरज मेडिकल * 61/0 * 10/0 * 159/0 *40/3 
* विवेकानंद हॉस्पिटल * 7/0 * 3/0 * 12/26 * 8/4 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many beds are left ... Important information in Sangli-Mirza for Corona victims