हुबळी - मिरज एक्सप्रेस 22 आॅगस्टपर्यंत रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मिरज - महापुरामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक रुळांवर येण्याची चिन्हे नाहीत. गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. हुबळी व धारवाड सेक्शनमध्ये कामे सुरु असल्याने मिरज - हुबळी - मिरज एक्सप्रेस 12 ते 22 आॅगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

मिरज - महापुरामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक रुळांवर येण्याची चिन्हे नाहीत. गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. हुबळी व धारवाड सेक्शनमध्ये कामे सुरु असल्याने मिरज - हुबळी - मिरज एक्सप्रेस 12 ते 22 आॅगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर - जयपूर ( 15 अॉगस्ट ), जयपूर - यशवंतपूर ( 17 अॉगस्ट ), गांधीधाम - बंगळुर ( 13 अॉगस्ट ), जोधपूर - बंगळूर ( 15 अॉगस्ट  ), म्हैसूर - अजमेर  (13 अॉगस्ट ), अजमेर - म्हैसूर ( 16 अॉगस्ट  ) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

सध्या मिरज - कोल्हापूर वगळता मिरजेतून पुणे, बेळगाव व सोलापूर मार्ग सुरु झाले आहेत. सोलापूर - मिरज एक्सप्रेस मंगळवारपर्यंत ( ता. 13 ) कराडपर्यंत वाढवली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hubli - Miraj Express canceled until August 22